भारताला ‘इंडिया’ हे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले नव्हते; वाचा सत्य
दिल्लीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जी-20 शिखर परिषदेत आलेल्या मान्यवर राष्ट्रप्रमुख आणि पंतप्रधाना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाठवलेल्या आमंत्रणावर ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे देशाचे इंडिया नाव हटवून आता ‘भारत’ या नावाचा वापर केला जाईल, अशी सर्वत्र चर्चा सुरू झाली.
या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक मेसेजमध्ये व्हायरल होते आहे. ज्यामध्ये ऑक्सफोर्ड डिक्शनरीनुसार इंडिया या शब्दाचा अर्थ ‘इंडिपेंडेंट नेशन डिक्लेअर इन ऑगस्ट’असा असून देशाला हे नाव डॉ. आंबेडकरांनी दिले आहे. असा दावा केला जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल मेसेचमध्ये केलेला दावा खोटा आहे. ऑक्सफोर्ड डिक्शनरीत ‘इंडिया’ शब्दाचा अर्थ ‘इंडिपेंडेंट नेशन डिक्लेअर इन ऑगस्ट’ नाही. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला इंडिया हे नाव दिले नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल मेसेजमध्ये लिहिले की, “भारतालाच English मध्ये India का म्हणतात? तर Oxford Dictionary नुसार India हा शब्द कसा आला याची ९९% लोकांना माहिती सुद्धा नाही. I – Independent, N- Nation, D- Declared, I – In, A- August म्हणून इंडिया (India) हे नाव Dr.B.R Ambedkar यांनी दिले आहे.”
मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
प्रथम कीवर्ड सर्च केल्यावर 1947 पूर्वीच्या अनेक अधिकृत ब्रिटिश कागद पत्रामध्ये ‘इंडिया’ शब्दाचा वापर केल्याचे आढळून आले.
भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. परंतु, आपल्याला हे माहिती आहे की, इंडिया हा शब्द त्यापूर्वीपासून वापरात आहे. इस्ट ‘इंडिया’ कंपनीची स्थापना तर 1600 मध्ये झाली होती. अनेक ऐतिहासिक कागदपत्रात भारताला इंडिया असे संबोधण्यात आलेले आहे. त्यामुळे इंडिया शब्दाला लॉगफॉर्म Independent Nation Declared In August असा तर बिलकूल नाही.
ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये सुद्धा India शब्दाची व्युत्पत्ती व्हायरल मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे झाल्याचे म्हटलेले नाही. ऑक्सफोर्ड डिक्शनरीच्या पान क्रमांक 580 वर इंडियाचा उल्लेख “आशिया खंडातील सिंधू नदीच्या पूर्वेला आणि हिमालय पर्वताच्या दक्षिण भागात स्थित असलेला देश” असा केलेला आहे.
मग इंडिया नाव आले कुठून?
इंडिया (India) हा शब्द इंडस (Indus) या शब्दापासून तयार झाला आहे. संस्कृत भाषेतील मूळ शब्द सिंधू (Sindu) आहे.
प्राचीन काळी इराण आणि अरब प्रांतातील लोक ‘स’ अक्षराला ‘ह’ उच्चार करायचे. त्यामुळे ते सिंधू प्रांताला हा Hindos म्हणायचे तर ग्रीक लोक Indos म्हणायचे.
अडीच हजार वर्षांपूर्वी जेव्हा ग्रीक आणि इराणी लोक या प्रदेशात आले ते Sindu प्रांताला Hindos किंवा Indos असे म्हणायचे.
प्राचीन काळी इराण आणि अरब प्रांतातील लोक ‘स’ अक्षराला ‘ह’ उच्चार करायचे. त्यामुळे सिंधू हा हिंदू (Hindu) म्हणायचे.
मेसेडोनिआचा राजा अलेक्झांडरने भारतावर चालून आल्यावर सिंधू नदीच्या आसपासचा प्रदेश इंडिया नावाने ओळखला जाऊ लागला. नवव्या शतकातील Old English Orosius पुस्तकात इंडिया असा उल्लेख आहे. किंग जेम्स बायबलमध्ये Indie असा उल्लेख आहे.
याविषयी अधिक सखोल माहिती येथे वाचा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इंडिया व भारत नावांविषयी काय म्हटले ?
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाचे नाव काय असावे या विषयावर 18 सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेत प्रत्यक्ष चर्चा झाली होती. त्यावेळी भारत, हिंदूस्थान, हिंद, भारतभूमी, भारतवर्ष असे विविध पर्याय सुचविण्यात आले. शेवटी संविधानच्या आर्टिकल 1 मध्ये India, that is Bharat, shall be a Union of States असे निश्चित करण्यात आले. भारताने द्विनाम पद्धती स्वीकारली.
या चर्चेत भारत नावाला कोणत्याही सदस्यांचा विरोध नसल्यामुळे देशासाठी हे नाव स्वीकारण्यात आले आहे. आता फक्त गोष्ट इतकीच आहे की, आपल्याला इंडिया नावाचा पर्याय मिळाला आहे. आपण आता फक्त भारत शब्दानंतर इंडिया हा शब्द यावा इतकीच चर्चा करतो आहोत, तसेच हा वादविवाद अनावश्यक आहे, अशी भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली होती.
अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे इंडिया व भारत नावांच्या बाबतीत पक्षविरहित होते.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, भारताला ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य मिळाले म्हणून देशाचे नाव इंडिया ठेवण्यात आले नाही. सदरील व्हायरल मेसेज फेक आहे. इंडियाचे नावाचा फुल फॉर्म Independent Nation Declared In August नाही.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:भारताला ‘इंडिया’ हे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले नव्हते; वाचा सत्य
Written By: Sagar Rawate
Result: Misleading