पाहावे ते नवलचः नरेंद्र मोदींच्या घरी खरंच शरद पवारांचा फोटो लावलेला आहे?

False राजकीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार कितीही कट्टर राजकीय विरोधक असले तरी, वेळोवेळी दोघांनीही वैयक्तिक पातळीवर जिव्हाळ्याचे संबंध असल्याची कबुली दिलेली आहे. मोदी तर एवढेही म्हटले होते की, शरद पवारांनीच राजकारणात मला बोट धरुन चालायला शिकवलं. आता तर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय की, मोदींच्या घरात शरद पवारांचा फोटो लावलेला आहे.

फेसबुकअर्काइव्ह

फेसबुकवर शेयर होत असलेल्या फोटोमध्ये नरेंद्र मोदी त्यांच्या आईचे आशीर्वाद घेत आहेत. तसेच त्यांच्या मागे भिंतीवर शरद पवारांचा फोटो लावलेला दिसतो. सोबत कॅप्शन लिहिले की, मोदींच्या घरात प्रेरणास्थान म्हणून पवार साहेबांचा फोटो!! फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.

तथ्य पडताळणी

सदरील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर इंडिया टुडेची एक बातमी आढळली. त्यानुसार, मंगळवारी (23 एप्रिल) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील अहमदाबाद येथे मतदान केले. तत्पूर्वी त्यांनी गांधीनगर येथील घरी जाऊन त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले.

मूळ बातमी – इंडिया टुडेअर्काइव्हलोकसत्ताअर्काइव्ह

एएनआय (ANI) वृत्तसंस्थेने मोदींच्या या भेटीचे फोटो ट्विट केले आहेत. यामध्ये फेसबुक पोस्टमधील फोटोशी साम्य असणारे तीन फोटो दिलेले आहेत. ते तुम्ही खाली दिलेल्या ट्विटमध्ये पाहू शकता. यामध्ये स्पष्ट दिसते की, मोदींच्या घरातील भिंतीवर पवारांचा नाही तर, राधा-कृष्णाचा फोटो आहे.

अर्काइव्ह

या प्रसंगाचा व्हिडियोदेखील पाहा.

अर्काइव्ह

आता दोन्ही फोटोंची तुलना करून पाहू.

निष्कर्ष

फेसबुकवरील संबंधित फोटो मूळ फोटोशी छेडछाड/एडिट करून तयार करण्यात आलेला आहे. मोदींच्या घरातील राधा-कृष्णाच्या फोटोऐवजी त्या जागी शरद पवारांचा फोटो दाखवण्यात आला आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:पाहावे ते नवलचः नरेंद्र मोदींच्या घरी खरंच शरद पवारांचा फोटो लावलेला आहे?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False