यंदाचा लालबागचा गणपती म्हणून अमिताभ बच्चन यांनी केला 2016 मधील व्हिडिओ शेअर

False सामाजिक

प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ‘लालबागचा राजा’ गणपतीचे पहिले दर्शन म्हणून एका व्हिडिओ शेअर केला.बच्चन यांच्यासह अनेकांनी हाच व्हिडिओ यंदाचा गणपती म्हणून शेअर केला. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ 2016 सालच्या ‘लालबागचा राजा’ गणपतीचा आहे.

काय आहे दावा?

मूळ व्हिडिओ – ट्विटर  । अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

या व्हिडिओतील की-फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ तर पाच वर्षांपूर्वीचा आहे. 

राजश्री मराठी नामक युट्यूब चॅनेलवर हाच व्हिडिओ 3 सप्टेंबर 2016 रोजी अपलोड करण्यात आला होता. त्यात म्हटले की, हा व्हिडिओ ‘लालबागचा राजा’चे पहिले दर्शन आहे.

मग आणखी व्हिडिओ सर्च केल्यावर लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलवर या मूर्तीचा समोरून घेतलेला व्हिडिओ आढळला. यावरून स्पष्ट होते की, हा व्हिडिओ 2016 मधील ‘लालबागचा राजा’च्या मूर्तीचा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने ‘लालबागचा राजा’ मंडळ समितीचे सदस्य मंगेश आंबरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी हा व्हिडिओ यंदाच्या मूर्तीचा नसल्याचे सांगितले.

ते म्हणाले की, “हा व्हिडिओ 2016 मधील आहे. यंदाचा गणपती चार फुट उंच आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव शासन निर्णयानुसारच होणार असून, तसेच गर्दी टाळण्यासाठी मंडळाने ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध केली आहे.”

यंदाच्या ‘लालबागचा राजा’चे लाईव्ह प्रक्षेपण आपण खाली पाहू शकता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, अमिताभ बच्चन यांनी पाच वर्षे जुन्या मूर्तीचा व्हिडिओ यंदाचा ‘लालबागचा राजा’ गणपती म्हणून शेअर केला.

Avatar

Title:यंदाचा लालबागचा गणपती म्हणून अमिताभ बच्चन यांनी केला 2016 मधील व्हिडिओ शेअर

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False