ऑस्ट्रेलियातील वणव्यात होरपळलेले प्राणी म्हणून जुने व असंबंधित फोटो व्हायरल. वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय

ऑस्ट्रेलियामध्ये लागलेल्या वणव्यामुळे तेथील नागरिकांसह वन्यजीवांना मोठा फटका बसला आहे. लाखो प्राण्यांना या आगीत आपला जीव गमवावा लागला. आगीत होपळून निघालेल्या प्राण्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेयर होत आहेत. त्याद्वारे ऑस्ट्रेलियातील आग लवकरात लवकर विझण्याची प्रार्थना करण्याचे आवाहन केले जात आहे.

लोकांचा हेतू जरी चांगला असला तरी सोशल मीडियावरील अनेक फोटो ऑस्ट्रेलियातील वणव्याचे नसल्याचे लक्षात आले. अनेक फोटो जुने आणि इतर देशांमधील आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोंची पडताळणी करून त्यांचे सत्य समोर आणले आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुक 

तथ्य पडताळणी

सगळ्या फोटोंना गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर कळाले की, खाली दिलेले फोटो ऑस्ट्रेलियात सध्या लागलेल्या आगीचे नाहीत.

फोटो क्र. 1

स्थळ: जकार्ता, इंडोनेशिया

तारीखः 15 नोव्हेंबर 2012

विवरणः अवैधरीत्या शिकार करून मारलेले दुर्मिळ वाघ व भालूंच्या शवामध्ये भुसा भरून विकणाऱ्या टोळीकडून जकार्ता प्रशासनाने शेकडो शव जप्त केले होते. त्यांना जाळून नष्ट करण्यात येत असतानाचे हे फोटो आहेत.

संदर्भ: डेली मेल (युके)


फोटो क्र. 2

स्थळ:  कॅलिफोर्निया, अमेरिका

तारीख: 13 नोव्हेंबर 2018

विवरणः कॅलिफोर्नियाच्या जंगलामध्ये लागलेल्या आगीत ही मांजर आणि ससा भाजून मृत्यूमुखी पडले होते.

संदर्भः डेली मेल (युके)


फोटो क्र. 3

स्थळः कॅलिफोर्निया, अमेरिका

तारीखः 22 जून 2016

विवरणः कडाक्याच्या उन्हाळ्यात उष्णेतच्या लाटेमुळे 2016 साली कॅलिफोर्नियामध्ये लागलेल्या आगीपासून दूर पळणाऱ्या शहामृगाचे हे फोटो आहेत.

संदर्भः एबीसी नेटडेली मेल (युके)


फोटो क्र. 4

स्थळः कॅलिफोर्निया, अमेरिका

तारीखः 24 ऑगस्ट 2013

विवरणः अमेरिकेतील योसेमाईट राष्ट्रीय उद्यानामध्ये लागलेल्या आगीपासून जाणाऱ्या गाईचा हा फोटो आहे.

संदर्भः नॅशनल जिओग्राफीक


फोटो क्र. 5

हा मोबाईल फोनचा वॉलपेपर आहे. अनेक फोटो वॉलपेपर साईटवर तो उपलब्ध आहे. तसेच फोटोतील दृश्य हे आगीचे नसून, ते सुर्यास्ताचे आहे.

संदर्भः वॉलपेपर्स क्राफ्ट


फोटो क्र. 6

स्थळः कॅलिफोर्निया, अमेरिका

तारीखः 30 ऑक्टोबर 2019

विवरणः कॅलिफोर्नियामध्ये दोन महिन्यांपूर्वी लागलेल्या आगीतून घोड्यांना वाचतानाचा हा फोटो आहे. 

संदर्भः डेली मेल (युके)


फोटो क्र. 7

स्थळः कॅलिफोर्निया, अमेरिका

तारीखः 14 नोव्हेंबर, 2018

विवरणः कॅलिफोर्नियातील कॅम्प फायर वणव्यापासून सुरक्षित जागा शोधणाऱ्या सशाचा हा फोटो गेटी इमेजतर्फे छायाचित्रकार रॉबिन बेक यांनी काढला होता.

संदर्भः पॉप्युलर मेकॅनिक्स


फोटो क्र. 8

स्थळ: बार्बोसा, ऑस्ट्रेलिया

तारीखः 15 जानेवारी 2014

विविरणः पाच वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातील बार्बोसा प्रांतामध्ये लागलेल्या आगीचा आहे. तेथील क्रॉन्डॉर्फ वाईनरीमध्ये लागलेल्या या आगीचा रॉय वॅन डर वेग्ट यांनी हा फोटो काढला होता.

संदर्भः डिकॅन्टर


फोटो क्र. 9

स्थळः इंडोनेशिया

विविरणः इंटरनॅशनल अ‍ॅनिमल रेस्क्यू संघटनेचे कार्यकर्ते इंडोनेशियामध्ये माकडाला सुरक्षित स्थळी घेऊन जातानाचा हा फोटो आहे.

संदर्भः रेनफॉरेस्ट रेस्क्यू


फोटो क्र. 10

स्थळः विक्टोरिया, ऑस्ट्रेलिया

तारीखः 13 ऑक्टोबर 2009

विवरणः ऑस्ट्रेलियातील विक्टोरिया भागात 2009 साली लागलेल्या आगीच्या वेळी स्टेला रीड यांनी हा फोटो काढला होता.

संदर्भः विक्टोरिया म्युझियम


निष्कर्षः

यावरून लक्षात येते की, ऑस्ट्रेलियातील वणव्याचे फोटो म्हणून अनेक जुने आणि असंबंधित फोटो सोशल मीडियावर शेयर केले जात आहेत. ऑगस्ट महिन्यात अ‍ॅमेझॉन वर्षावनांमध्ये लागलेल्या आग लागली होती तेव्हादेखील असेच असंबंधित फोटो शेयर करण्यात आले होते. फॅक्ट क्रेसेंडोने त्यांची पडताळणी करून सत्य समोर आणले होते.

Avatar

Title:ऑस्ट्रेलियातील वणव्यात होरपळलेले प्राणी म्हणून जुने व असंबंधित फोटो व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False