सत्य पडताळणी : नीरव मोदींनी कॉंग्रेसला 98 कोटी रुपये दिले का?

False अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय

Z:\Nita\Thubnail-Post-No-2-nita-mam.png

सोशल मीडियावर एका चेकचा फोटो व्हायरल झाला आहे. या चेक संदर्भात नीरव मोदी याने कॉंग्रेस पक्षाला 98 कोटी रुपये दिल्याचा दावा करण्यात आलेला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याविषयी सत्य पडताळणी केली.

फेसबुकअर्काईव्ह

पोस्टमध्ये 2011 मध्ये नीरव मोदी याने कॉंग्रेस पक्षाला 98 कोटी रूपये दिले असे म्हटले आहे. याशिवाय इतरही आर्थिक बाबींशी निगडित वक्तव्ये करण्यात आलेली आहेत. तसेच पोस्टमध्ये मैने अकेले नही खाया, सबको हिस्सा दिया है, असे म्हणण्यात आले आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा ने अपना पोल खुलने के डर से विदेश भगा दिया असे म्हटले आहे. पोस्टमध्ये दाखविण्यात आलेल्या चेकबद्दल सत्य जाणून घेण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने चेकमध्ये नमूद करण्यात आलेले एक्सिस बॅंकेचे अकाउंट सर्च केले.

एक्सिस बॅंकेच्या चेकमध्ये नमूद करण्यात आलेला अकाउंट नंबर 914010006904607 चा शोध घेतला.

Z:\Amruta\Axis Bank\pic 1.1 - Copy (3).jpg

एक्सिस बॅंकेच्या मोबाईल अ‍ॅपमध्ये पोस्टमधील चेकमध्ये देण्यात आलेली अकाउंट नंबर टाकल्यानंतर हे अकाउंट बंद आहे असे समोर आले.

Z:\Amruta\Axis Bank\Pic 1.4.jpg

यानंतर पोस्टमध्ये दाखविण्यात आलेले अकाउंट नंबर बद्दल एक्सिस बद्दल क्वोरा या विभागात बॅंकेचे अकाउंट नंबर सुरु असताना किती डिजिटचा नंबर असतो हे शोधले. यामध्ये एक्सिस बॅंकेचे मॅनेजर विनय नायर यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे एक्सिस बॅंकेचे अकाउंट नंबर 15 अंकांचा असतो. एक्सिस बॅंकेमध्ये जेव्हा 2010 नंतर खाते उघडण्यात येते तेव्हा ते अकाउंट 9 अंकांपासून सुरुवात होते. त्यानंतर येणारे दोन अंक म्हणजे हे अकाउंट कोणत्या वर्षी उघडण्यात आले आहे हे दर्शवतो. त्यानंतरचे येणारे दोन अंक उघडण्यात आलेले खाते हे कोणत्या प्रकारात मोडते हे दर्शवते. यामध्ये बचत खाते यासाठी 01, करंट खाते यासाठी 02, रोख कर्जाच्या खात्यासाठी 03 आणि कर्जाच्या खात्यासाठी 06 असे नंबर असतात.

पोस्टमध्ये देण्यात आलेल्या चेकमधील अकाउंट नंबर 2010 नंतरचे आहे. कारण खात्याची सुरुवात 9 या अंकापासून होते. त्यानंतर अकाउंट नंबरमध्ये 14 हा अंक दिसतो, ज्याचा अर्थ हे अकाउंट 2014 नंतर उघडण्यात आले आहे. त्यानंतर 01 हा नंबर आहे म्हणजे हे एक बचत खाते आहे.

Quora.com | ArchivedLink  

  • याशिवाय पोस्टमध्ये दाखविण्यात आलेल्या चेकची तारीख ही 25 सप्टेंबर 2011 अशी आहे. जर एक्सिस बॅंकेचे खाते हे 2014 नंतर उघडण्यात आले असेल तर चेक 2011 मध्ये कसा देता येईल? तीन वर्षांपुर्वीचा चेक कसा काय देता येईल? आणि जरी असा चेक दिला तरी तो चेक बॅंकेद्वारे वठवला जात नाही.  
  • दुसरी गोष्ट चेकमध्ये जिकडे चेक देणाऱ्याची सही आणि नाव देण्यात येते त्या ठिकाणी खाडाखोड करण्यात आल्याचे दिसून येते.
  • पोस्टमध्ये दाखविण्यात आलेल्या चेकच्या डावीकडील भागात दोन तिरप्या (क्रॉस) रेषा मारण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे हा चेक वठण्यासाठी अकाउंट पे होवू शकत नाही. म्हणजेच हा चेक विड्रॉ कॅश या प्रकारात मोडतो. चेकद्वारे आपण एकाचवेळी 98 कोटी रुपये कोणत्याही बॅंकेतून काढू शकत नाही.
  • पोस्टमधील चेकमध्ये 98 कोटी रुपये याचे इंग्रजीमधील स्पेलिंग चुकलेले आहे. 98 कोटी रुपये याचे इंग्रजीमधील ninety असे असायला हवे होते.
  • पोस्टमध्ये दाखविण्यात आलेला चेकमध्ये डावीकडे North Lakhimpur Assam Branch असे लिहिलेले आहे. नीरव मोदी यांनी अख्खे आयुष्य हे मुंबईमध्ये गेले. त्यामुळे आसाम ब्रॅंचमधील चेक का देण्यात येईल? त्यामुळे या चेकच्या सत्यतेबद्दल प्रश्नचिन्ह मनात निर्माण होतात. तसेच मुंबईत राहणारा व्यक्ती आसाममध्ये बॅंकेचे खाते उघडू शकत ऩाही.
  • यानंतर नीरव मोदी यांच्यावर पंजाब नॅशनल बॅंकेचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. जर नीरव मोदी यांच्यावर 2018 मध्ये पंजाब नॅशनल बॅंकेचा घोटाऴा केल्याचा आरोप असेल, कॉंग्रेस पक्षाला देण्यात येणाऱ्या चेकवर 2011 मधील तारीख दर्शविण्यात आली असेल, आणि चेकवर देण्यात आलेला खाते क्रमांक 2014 नंतर उघडण्यात आले असेल तर पोस्टमध्ये दाखविण्यात येणारा चेकच्या सत्यतेबद्दल अधिक संशय निर्माण होतो.
  • पोस्टमध्ये दाखविण्यात येणाऱ्या चेकमध्ये सर्वात खाली चेकच्या उजव्या बाजूला नीरव मोदीच्या नावाच्या सहीजवळ खोडण्यात आलेले अर्धवट दिसणारे थापा असे नाव दिसून येते. त्यामुळे या चेकला गुगल रिव्हर्स इमेज केल्यावर अशा प्रकारचे फॅक्ट चेक Smhoaxslayer यांनी 4 मार्च 2018 मध्ये फॅक्ट चेक केले आहे असे समोर आले.  
  • यामध्ये त्यांनी फेसबुकच्या एका पोस्टचे प्रमाण देत पार्थोप्रतिम चक्रवर्ती या व्यक्तीच्या एक्सेस बॅंकेच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे काढण्यात आलेल्या माहितीच्या आधारे हे अकाउंटच कृष्णा बी.आर. थापा नावाच्या व्यक्तीचे होते.
Z:\Amruta\Axis Bank\pic 1.3.jpg

निष्कर्ष : सर्व संशोधनाअंती व्हायरल पोस्टमध्ये दाखविण्यात आलेला चेक हा एडिट करुन वापरण्यात त्याचा फोटो वापरण्यात आलेला आहे. तसेच नीरव मोदी यांनी कॉंग्रेस पक्षाला 98 कोटी रुपये दिले हा दावा असत्य आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : नीरव मोदींनी कॉंग्रेसला 98 कोटी रुपये दिले का?

Fact Check By: Amruta Kale 

Result: False