हैदराबादमधील बिबट्याचा व्हिडिओ पुणे, पिंपरी-चिंचवडमधील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

False राष्ट्रीय सामाजिक

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग बिबट्याप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांमध्ये बिबट्याचा अधिवास आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातही बिबट्या आढळल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यातच सध्या समाजमाध्यमात पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील ग्रेड सेपरेटरमध्ये (समतल विलगक) बिबट्या आढळल्याचा म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने हा व्हिडिओ पुणे किंवा पिंपरी-चिंचवड शहरातील आहे का? याची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुक / अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

नीट ऐकल्यावर या व्हिडिओ बोलणाऱ्या व्यक्ती या तेलगू भाषेत बोलत असल्याचे लक्षात आले. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याचा वेगवेगळे शब्दप्रयोग करत शोध घेतला. त्यावेळी युटूयूबवर एनटीव्ही तेलगू या वृत्तवाहिनीचा 14 मे 2020 रोजीचा एक व्हिडिओ दिसून आला. हा तोच व्हिडिओ आहे, जो समाजमाध्यमात पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा म्हणून व्हायरल होत आहे. ही घटना हैदराबाद येथील असल्याचे एनटीव्ही तेलगूने आपल्या वृत्तात म्हटले आहे. टीव्ही 9 भारतवर्ष आणि नेटवर्क 18 बिहार झारखंड या वृत्तवाहिन्यांनीही याबाबतचे वृत्त दिले आहे. 

अर्काइव्ह

याव्यतिरिक्त मुंबई मिरर या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावरही याबाबृतचे वृत्त दिसून आले. या वृत्तातही घटना हैदराबाद येथील असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

image3.png

अर्काइव्ह

या माहितीतुन हे स्पष्ट झाले की, हा व्हिडिओ पुणे किंवा पिंपरी-चिंचवड या शहरातील नसून हैदराबाद येथील आहे.

निष्कर्ष

रस्त्याच्या मधोमध बसलेल्या बिबट्याचा हा व्हिडिओ पुणे किंवा पिंपरी-चिंचवड येथील नसून हैदराबाद येथील आहे.

Avatar

Title:हैदराबादमधील बिबट्याचा व्हिडिओ पुणे, पिंपरी-चिंचवडमधील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False