बलात्कार हमारी संस्कृती का हिस्सा है असे भाजप नेत्या किरण खेर म्हणाल्या का?

False राजकीय | Political

सध्या सोशल मीडियावर भाजप नेत्या किरण खेर यांच्या बद्दलची पोस्ट व्हायरल होत आहे. बलात्कार हमारी भारतीय संस्कृती का हिस्सा है, हम इसे नही रोक सकते असे वाक्य भाजप नेते किरण खेर यांच्या नावाचा वापर करुन व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रिसेंडोने याविषयी केली सत्य पडताळणी.

फेसबुकअर्काईव्ह

फेसबुकवर बलात्कार हमारे संस्कृती का हिस्सा है हम इसे नही रोक सकते असे वक्तव्य भाजप नेत्या किरण खेर यांच्या नावाचा वापर करुन पोस्टमध्ये लिहिण्यात आलेले आहे. पोस्टमध्ये वायरल इन इंडिया डॉट नेट असेही म्हणण्यात आले आहे.

पोस्टमधील मजकूराची सत्यता तपासण्यासाठी आम्ही गुगलवर किरण खेर यांच्या नावाने सर्च केले. त्यानंतर भाजप नेत्या किरण खेर यांनी बलात्कार प्रकरणात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. परंतू ते वक्तव्य हे पोस्टमध्ये वायरल होणाऱ्या वक्तव्यापेक्षा वेगळे होते. तसेच ही घटना 30 नोव्हेंबर 2017 या रोजीची आहे.

काय म्हणाल्या होत्या भाजप नेत्या किरण खेर ?

प्रसारमाध्यमांना 2017 मधील एका मुलीच्या बलात्कार प्रकरणी प्रतिक्रिया देतांना भाजप नेत्या किरण खेर यांनी खबरदारीचा उपाय म्हणून जेव्हा मुलीला कळाले होते की ऑटोरिक्षामध्ये आधीच तीन पुरुष बसलेले असताना तिने या ऑटोरिक्षामध्ये बसायला नको होते. आम्ही जेव्हा मुंबईमध्ये फिरायचो तेव्हा आम्हांला सोडविण्यासाठी जे कोणी येत असे त्यांच्याजवळ आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून त्या ऑटो रिक्षाचा नंबर द्यायचो, असे म्हणाल्या होत्या. युट्युबवर एपीएन न्यूज या चॅनलवर 30 नोव्हेंबर 2017 रोजी याविषयीचा व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे.

लाईव्ह हिंदुस्तानअर्काईव्ह

एएनआय या वृत्तसंस्थेच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर याविषयीचे ट्विट 29 नोव्हेंबर 2017 रोजी अपलोड करण्यात आलेले आहे.

अर्काईव्ह

भाजप नेत्या किरण खेर यांच्या या वक्तव्याचा काँग्रेस नेते कुमार बंन्सल यांनी या वक्तव्याचा राजकीय स्टंट करत किरण खेर यांनी चंदीगडमधील महिलांना सुरक्षित कसे करता येईल असे म्हणाल्या असा आरोप खेर यांच्यावर केला. त्यानंतर भाजप नेत्या किरण खेर यांनी पुन्हा एकदा चंदीगडमधील बलात्कार घटना आणि कॉंग्रेस नेते कुमार बन्सल यांनी खेर यांच्यावर केलेला आरोप याविषयी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देवून स्पष्टपणे खुलासा केला. काँग्रेस नेते कुमार बंन्सल यांनी 29 नोव्हेंबर 2019 रोजी केलेले ट्विट आपण खाली पाहू शकता.

या वेळी किरण खेर म्हणाल्या की, मी तर असे म्हटले होते की, सध्या जमाना खुप खराब आहे. मुलींना खबरदारीचा उपाय करावाच लागेल. एखाद्या मुलीने रात्री 100 नंबर डायल केला तर चंदीगढ पोलिस लगेचच मदत करण्याच्या हेतूने पीसीआर पाठवते. यामध्ये कोणतेही राजकारण करण्याचा विषय नाही.

भाजप नेत्या किरण खेर यांच्या नंतरच्या प्रतिक्रियेचाही व्हिडिओ युट्युबवर द क्विंट चॅनलवर 30 नोव्हेंबर 2017 रोजी अपलोड करण्यात आलेला आहे.

फर्स्टपोस्टअर्काईव्ह

संपुर्ण संशोधनाअंती असे आढळून आले की, भाजप नेत्या किरण खेर यांनी चंदीगड बलात्कार प्रकरणी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत “जमाना बहुत खराब है” असे म्हटले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये बलात्कार हमारे संस्कृती का हिस्सा है हम इसे नही रोक सकते असे वक्तव्य भाजप नेता किरण खेर यांच्या नावाने पसरविण्यात येत आहे. लोकसभा 2019 निवडणूक अनुषंगाने जाणिवपूर्वक अशा प्रकारची पोस्ट पसरविण्यात येत आहे. भाजप नेत्या किरण खेर यांनी पोस्टमध्ये व्हायरल होणारे वक्तव्य म्हटलेले नाही.

निष्कर्ष :  भाजप नेत्या किरण खेर यांनी “जमाना बहुत खराब है” असे वक्तव्य नोव्हेंबर 2017 मध्ये केले असून, बलात्कार हमारे संस्कृती का हिस्सा है हम इसे नही रोक सकते असे त्या कधीही म्हणालेल्या नाहीत. त्यामुळे पोस्टमधील किरण खेर यांच्या नावाने देण्यात आलेला मजकूर असत्य आहे.

Avatar

Title:बलात्कार हमारी संस्कृती का हिस्सा है असे भाजप नेत्या किरण खेर म्हणाल्या का?

Fact Check By: Amruta Kale 

Result: False