दोन हजाराची नोट बदलण्यासाठी विशेष फॉर्म भरण्याची अफवा व्हायरल; वाचा सत्य
आरबीआयच्या घोषणेनुसार 23 मेपासून बँकेत दोन हजारच्या नोटा बदली करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर एका फॉर्मच्या फोटोसोबत दावा केला जात आहे की, दोन हजाराच्या नोटा बदलण्यासाठी बँकेत विशेष फॉर्म भरणे अनिवार्य आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा निव्वळ अफवा आहे. दोन हजाराच्या नोटा बदलण्यासाठी कोणताही फॉर्म भरणे अनिवार्य नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल पोस्टमध्ये बँक व्यवहाराचा फॉर्म एक दाखवला आहे.
युजर्स पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “हाच तो फोर्म आहे, ज्याला भरण्यासाठी आपल्याला बँकांबाहेर रांगा लावाव्या लागणार आहे.”
मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पाडताळणी
कीव्हडर्स सर्च केल्यावर कळाले की, आरबीआयने 19 मे 2023 रोजी प्रकाशित केलेल्या निर्यणयात स्पष्ट म्हटले आहे की, “दोन हाजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी नागरिक कोणत्याही बँकेत जाऊ शकतात. कोणत्याही बँकेतून नागरिकांना नोटा बदलता येईल व त्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची किंवा विशेष फॉर्म भरण्याची गरज नाही.”
या घोषणेनंतर त्याच दिवशी स्टेट बँक ऑफ इंडियाने एक पत्रक जारी केले की, “ग्राहकांना दोन हाजारच्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची किंवा स्लिप (फॉर्म) भरण्याची गरज नाही.”
फॅक्ट क्रेसेंडोने आरबीआयचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी स्पष्ट केले की, “आरबीआयने दोन हजाराच्या नोटा बदलण्यासाठी कोणताही फोर्म भरण्याची किंवा ओळखपत्र दाखवण्यची आवशक्ता नाही.”
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल दावा निव्वळ अफवा आहे. दोन हजारच्या नोटा बदलण्यासाठी कोणताही फॉर्म भरण्याची आवशक्ता नाही.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:दोन हजाराची नोट बदलण्यासाठी विशेष फॉर्म भरण्याची अफवा व्हायरल; वाचा सत्य
Written By: Sagar Rawate
Result: False