चंद्रपूर तालुक्यातील वाघांचा जूना व्हिडियो जुन्नर येथील म्हणून व्हायरल. वाचा सत्य

False सामाजिक

व्याघ्रदर्शन हा तसा कुतूहलाच विषय. वाघ किंवा अन्य वन्यप्राण्यांना मुक्त संचार करताना पाहण्याचा अनुभव काही वेगवळाच असतो. त्यामुळे सोशल मीडियावर वाघ/बिबट्या दिसल्याचे अनेक व्हिडियो शेयर केले जातात. अशाच एका व्हिडियोमध्ये दोन डौलदार वाघ रस्त्यावर आल्याचे दिसत आहेत. हा व्हिडियो पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील असल्याचा दावा केला जातोय. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला.

काय व्हिडियोमध्ये?

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक 

तथ्य पडताळणी

या व्हिडियोविषयी काही लोकांनी शंका घेतली आहे. एका युजरने म्हटले की, “पट्टेरी” वाघ जुन्नर तालुक्यात आहेत का???? खेड तालुक्यात 1988-90 ला तळेघर-भीमाशंकर ला शेवटचे पट्टेरी वाघ दिसले होते.

हाच व्हिडियो मुन्नर, यवतमाळ, अकोला, कर्नाटक अशा विविध ठिकाणचा म्हणून हा व्हिडियो पसरत आहे. 

मग हा व्हिडियो मूळात कुठला आहे?

व्हिडियोतील की-फ्रेम्स यांडेक्स रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर न्यूज-18 लोकमत वाहिनीवरील 13 नोव्हेंबर 2019 रोजीची एक बातमी आढळली. त्यानुसार, रात्री रस्त्यावर दोन वाघ दिसल्याचा हा व्हिडियो चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. रस्त्यावर वाघ आल्यावर तेथून जाणाऱ्या प्रवाशांनी हा व्हिडियो तयार केला होता. ही माहिती हॅलो महाराष्ट्र या चॅनेवरदेखील दिली आहे.

याविषयी अधिक माहिती घेतल्यावर ‘लोकमत’ने 15 नोव्हेंबर 2019 रोजीची बातमी सापडली. त्यानुसार, मूळ तालुक्यातील बफर परिक्षेत्रातील मूल-मारोडा रस्त्यावरील वर्दळीच्या मार्गावर दोन वाघाचे दर्शन झाले होते. येथील रेंज ऑफिसर श्री. बोबडे यांनी याविषयी खात्रीलायक माहिती नसल्याचे सांगितले. लोकशाही न्यूज, झी न्यूज यांनीदेखील हा व्हिडियो चंद्रपूर जिह्ल्यातील असल्याचे म्हटले आहे.

मूळ बातमी येथे वाचा – लोकमत

निष्कर्ष

हा व्हिडियो जुन्नर येथील नाही. हा व्हिडियो 4 महिन्यांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिसलेल्या वाघांचा व्हिडियो आहे. त्यामुळे सदरील पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा खोटा आहे.

Avatar

Title:चंद्रपूर तालुक्यातील वाघांचा जूना व्हिडियो जुन्नर येथील म्हणून व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False