हा फोटो शहीद कर्नल संतोष बाबू यांच्या मुलीचा नाही. वाचा या फोटोमागील सत्य

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. यामध्ये कर्नल संतोष बाबू यांचादेखील समावेश होता. सोशल मीडियावर सध्या एका लहान मुलगी संतोष बाबू यांच्या फोटोसमोर श्रद्धांजली वाहतानाचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, ही शहीद कर्नल बाबू यांचीच मुलगी आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता, हा दावा खोटा असल्याच समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

सदरील फोटो शेयर करून म्हटले की, “चीनच्या गोळीबारात शहीद झालेले कर्नल संतोष बाबू यांच्या घरी श्रद्धांजली वाहताना त्यांची मुलगी”

vira.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

लोकसत्तानेदेखील (अर्काइव्ह) हा फोटो शेयर करून म्हटले की,  शहिद वडिलांच्या फोटोसमोर उभी असलेली सहा वर्षांची चिमुकली पाहून प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याशिवाय राहणार नाहीत. झी न्यूजने (अर्काइव्ह) शीर्षक दिले की, शहीद कर्नलना त्यांच्या लेकीनं अशी वाहिली श्रद्धांजली.

तथ्य पडताळणी

सदरील फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) अधिकृत ट्विटर हँडलवरून हा फोटो शेयर करण्यत आला होता. ट्विटमधील माहितीनुसार, कर्नाटकमधील नेलामंगला तालुक्यातील ‘अभाविप’च्या कार्यकर्त्याने आपल्या लहान बहिणीसह शहीद कर्नल संतोष बाबू यांना श्रद्धांजली वाहिली होते. हे त्यावेळचे फोटो आहेत.

अर्काइव्ह

सोशल मीडियावर या लहान मुलीचा फोटो संतोष बाबू यांची मुलगी म्हणून शेयर होऊ लागल्यानंतर ‘अभाविप’ कर्नाटकच्या ट्विटर हँडलवरून याबाबत खुलासा करण्यात आला. त्यात स्पष्ट म्हटले की, या मुलीचा फोटो काही लोक कर्नल संतोष बाबू यांची मुलगी म्हणून शेयर करीत आहेत. आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, ही संतोष बाबू यांची मुलगी नाही. ती ‘अभाविप’च्या कार्यकर्त्याची बहिणी आहे.

अर्काइव्ह

‘अभाविप’ कर्नाटकने दुसऱ्या ट्विटमध्ये या मुलीचे नाव कु. मनश्री असल्याचे सांगितले.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, अभाविपच्या कार्यकर्त्याने स्वतःच्या घरात कर्नल संतोष बाबू यांना श्रद्धांजली वाहिली होती. यावेळी त्याच्या लहान बहिणीचा काढलेला फोटो व्हायरल झाला आणि अनेकांना गैरसमज झाला की, ती संतोष बाबू यांचीच मुलगी आहे. 

Avatar

Title:हा फोटो शहीद कर्नल संतोष बाबू यांच्या मुलीचा नाही. वाचा या फोटोमागील सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply