
लॉकडाऊनच्या काळात मशिदीत जाणाऱ्या नागरिकांना पोलीस अडवत असताना त्यांच्या कामात एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण हे अडथळा आणत आहेत. पोलिसांना खुलेआम धमकावत आहेत. फिजीकल डिस्टंसिंग न पाळता अधिकाऱ्यांना भिडत आहेत. हे असंच चालायचं महाआघाडी सरकारमध्ये, अशा माहितीसह समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ पसरत आहे. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी लॉकडाऊनच्या काळात पोलिसांना धमकावले आहे का? याचा शोध घेतला. त्यावेळी भाजपचे प्रवक्ते अवधुत वाघ यांनी केलेले 29 एप्रिल 2020 रोजी केलेले एक ट्विट दिसून आले. त्यांनी या केलेल्या ट्विटमध्ये तोच व्हिडिओ आणि दावा दिसून आला. जो समाजमाध्यमात व्हायरल होत आहे.
या ट्विटवर प्रतिक्रिया देताना अनेकांनी हा व्हिडिओ जुना असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आम्ही आमचा शोध पुढे नेला. या व्हिडिओत मुंबई लाईव्ह या स्थानिक संकेतस्थळाचा लोगो स्पष्ट दिसून आला. या संकेतस्थळावर वारिस पठाण यांचा पोलिसांशी वाद झाल्याचे तीन वर्षापुर्वीचे वृत्त दिसून आले. मुंबई लाईव्हच्या युटूयूब चॅनलवर 18 नोव्हेंबर 2016 रोजी याच वादाचा हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असल्याचे दिसून आले. यातून हे स्पष्ट झाले की हा व्हिडिओ जुना म्हणजेच तीन वर्षापुर्वीचा आहे.
मुंबई लाईव्हने याबाबतचा आपल्या ट्विटर खात्यावरुन खुलासा करत ही घटना आणि व्हिडिओ तीन वर्षापुर्वीचे असल्याचे स्पष्ट करत याबाबतचे ट्विट केल्याचे आपण खाली पाहू शकता.
माजी आमदार वारीस पठाण यांनी हा व्हिडिओ जुना असल्याचे आणि याबाबत असत्य माहिती पसरविण्याविरोधात पावले उचलावीत, असे ट्विट केल्याचेही आपण खाली पाहू शकता
निष्कर्ष
माजी आमदार वारीस पठाण यांचा तीन वर्षापुर्वीचा जुना व्हिडिओ लॉकडाऊनशी संबंध जोडून व्हायरल करण्यात येत आहे. त्याचा लॉकडाऊनशी संबंध असल्याचे असत्य आहे.

Title:वारिस पठाण यांचा जुना व्हिडिओ लॉकडाऊनच्या काळातील म्हणून व्हायरल; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
