प्रियंका गांधी यांनी केरळमध्ये गळ्यात क्रॉस घालून मते मागितली? वाचा सत्य

False राजकीय | Political

काँग्रेसच्या उत्तरप्रदेश (पूर्व) महासचिव प्रियंका गांधी यांनी केरळमध्ये गळ्यात ख्रिस्ती धर्माचे क्रॉस घालून मते मागितली, असा सोशल मीडियावर दावा केला जात आहे. धर्माच्या आधारावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रियंका गांधी उत्तरप्रदेशमध्ये रुद्राक्ष माळ घालून तर केरळमध्ये क्रॉस घालतात, असे सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

अर्काइव्ह

वरील पोस्टमध्ये प्रियंका गांधीचे दोन फोटो आहेत. एकामध्ये त्यांनी गळ्यात क्रॉस घातल्याचे दिसते तर, दुसऱ्या फोटोमध्ये त्यांनी रुद्राक्ष माळ परिधान केलेली दिसते. सोबत कॅप्शन दिले की, युपीमध्ये हिंदूंची मतं मागताना रुद्राक्ष आणि जानवं…आणि केरळ मध्ये गळ्यात क्रॉस…ही दोघं भैन भौ मूर्ख हिंदूंना गंडवत्यात आणि हे गुलाम *** त्यांच्यामागनं फिरत्यात

अशीच पोस्ट फेसबुकवर मोठ्या प्रमाणात शेयर केली जात आहे.

तथ्य पडताळणी

फॅक्ट क्रेसेंडोने सर्वप्रथम प्रियंका गांधींचा क्रॉस घातलेला फोटो गुगल रिव्हर्स इमेज सर्च केला. या फोटोशी साम्य असणारे अनेक फोटो समोर आले. ते तुम्ही खाली पाहू शकता.

इंटरनॅशनल बिझनेस टाईम्स वेबसाईटवरील एका बातमी खालील फोटो वापरण्यात आला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रियंका गांधी यांनी गळ्यात क्रॉस नाही तर, अंडाकृती पेन्डेंट घातलेले आहे. या फोटोच्या कॅप्शननुसार, हा फोटो उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीदरम्यान रायबरेली येथे 17 फेब्रुवारी 2017 रोजी आयोजित सभेचा आहे. हा फोटो गेटी इमेजेसचा असून, संजय कनोजिया या छायाचित्रकाराने तो काढलेला आहे.  

मूळ बातमी येथे पाहा – इंटरनॅशनल बिझनेस टाईम्सअर्काइव्ह

प्रियंका गांधीच्या महाराजगंज, रायबरेली येथील सभेची बातमी तुम्ही येथे वाचू शकता – इंडिया टुडेअर्काइव्ह

फॅक्ट क्रेसेंडोने गेटी इमेजेसच्या वेबसाईटवर या फोटोचा शोध घेतला. तो मूळ फोटो तुम्ही खाली इम्बेड केलेला पाहू शकता.

Embed from Getty Images

अर्काइव्ह

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनदेखील 17 फेब्रुवारी 2017 रोजी महाराजगंज, रायबरेली येथील सभेचे फोटो शेयर करण्यात आले होते. ते ट्विट तुम्ही खाली पाहू शकता या फोटोमध्येदेखील प्रियंका गांधी यांनी गळ्यात क्रॉस घातलेले नाही.

अर्काइव्ह

काँग्रेसच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रियंका गांधी यांनी या सभेत केलेल्या भाषणाचा व्हिडियो उपलब्ध आहे. यामध्ये स्पष्ट दिसते की, त्यांनी गळ्यात अंडाकृती पेन्डेंट घातलेले आहे. हा व्हिडियो खाली पाहू शकता.

आता फेसबुकवर शेयर करण्यात येणारा फोटो आणि मूळ (ओरिजिनल) फोटो यांची तुलना करून पाहू.

तसेच याच सभेतील इतर फोटोः

वरील सर्व पुराव्यांवरून हे सिद्ध होते की, प्रियंका गांधींनी गळ्यात क्रॉस घातलेला फोटो खोटा आहे.

निष्कर्ष

प्रियंका गांधी यांनी केरळमध्ये क्रॉस घालून प्रचार केल्याचे छायाचित्र फोटोशॉप केलेले असून, मूळ फोटो दोन वर्षांपूर्वीच्या रायबरेली येथील सभेतील आहे. त्यामुळे फेसबुक पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा असत्य आहे.

Avatar

Title:प्रियंका गांधी यांनी केरळमध्ये गळ्यात क्रॉस घालून मते मागितली? वाचा सत्य

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False