चंदीगडच्या प्राणीसंग्रहालयाचे छायाचित्र कोल्हापुरातील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Coronavirus False सामाजिक

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणे ही निर्मनुष्य झाल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठाचा परिसरही निर्मनुष्य झाला असून तेथे रस्त्यावर फिरणाऱ्या मोर आणि पोपटांचे एक छायाचित्र सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. हे छायाचित्र शिवाजी विद्यापीठातीलच आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

screenshot-www.facebook.com-2020.04.24-09_15_50.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी 

समाजमाध्यमात व्हायरल होत असलेले हे छायाचित्र शिवाजी विद्यापीठातील आहे का? हे जाणून घेण्यासाठी ते रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी युटूयूबवर 2 फेब्रुवारी 2018 रोजी अपलोड करण्यात आलेला एक व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओसोबत देण्यात आलेल्या माहितीत हा चंदीगडमधील चट्टबीर प्राणीसंग्रहालयाचा व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओत 3 मिनिटे 5 सेकंद ते 3 मिनिटे 35 सेकंद या कालावधीत आपल्याला व्हायरल होत असलेल्या छायाचित्रातील दृश्ये दिसून येतात. या व्हिडिओखाली असलेल्या कमेंटमध्येही ही दृश्ये सध्या व्हायरल होत असल्याचे म्हटलं असल्याचे आपण पाहू शकतो.

Archive

याव्यतिरिक्त इन्स्टाग्रामवर वन्यजीव छायाचित्रकार वामा दलाल यांनी 29 जुन 2019 रोजी हेच छायाचित्र पोस्ट केले असल्याचे दिसून आले. त्यांनीही हे छायाचित्र चंदीगड येथील असल्याचे स्पष्ट केले आहे. यातुन हेही स्पष्ट झाले की, हे छायाचित्र लॉकडाऊनच्या अगोदरचे आहे. 

Archive

वन्यजीव छायाचित्रकार वामा दलाल यांनी हे छायाचित्र खूपच व्हायरल झाल्यावर चंदीगड येथील असल्याचे 29 फेब्रुवारी 2020 रोजी स्पष्ट ट्विटद्वारेही स्पष्ट केले. 

Archive

निष्कर्ष

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील लॉकडाऊनच्या काळातील म्हणून व्हायरल होत असलेले हे छायाचित्र चंदीगडमधील चट्टबीर प्राणीसंग्रहालयातील आहे.

Avatar

Title:चंदीगडच्या प्राणीसंग्रहालयाचे छायाचित्र कोल्हापुरातील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False