तथ्य पडताळणी : राहुल गांधी हे राजीव गांधींचे पुत्र नाहीत?

False राजकीय

अमेरिकी डीएनए विशेषज्ञ डॉ. मार्टिन सिजो यांनी दावा केला आहे की, राहुल गांधी हे राजीव गांधी यांचे पुत्र नाहीत. अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

अमेरिकी डीएनए विशेषज्ञ डॉ. मार्टिन सिजो यांनी असा काय दावा केला आहे का? हे डॉ. मार्टिन सिजो कोण आहेत याचा आम्ही सगळ्यात पहिल्यादा शोध घेतला. त्यावेळी आम्हाला डॉ. मार्टिन सिजो यांच्याविषयी कोणतीही माहिती आढळून आली नाही. डॉक्टर मार्टिज सिजो यांनी पत्रकार परिषद घेतल्याचे या वृत्तपत्राच्या कात्रणात म्हटले आहे. ही पत्रकार परिषद कधी आणि कुठे घेतली याचा कुठलाही उल्लेख यात आढळून येत नाही. आम्ही याबाबत अधिक पडताळणी केली असता आम्हाला अनंतकुमार हेगडे यांनी राहुल गांधींबद्दल केलेले एक वक्तव्य आढळून आले. या वृत्तात कुठेही अमेरिकी डीएनए विशेषज्ञ डॉ. मार्टिन सिजो यांचा उल्लेख नसून त्यांनी डीएनए चाचणी केल्याचे म्हटलेले नाही.

अक्राईव्ह

राहुल गांधी यांनी स्वत: याविषयी काही म्हटले आहे का याचाही आम्ही शोध घेतला तेव्हा आम्हाला त्यांनी डीएनएविषयी केलेले खालील विधान दिसून आले.

अक्राईव्ह

निष्कर्ष

अमेरिकी डीएनए विशेषज्ञ डॉ. मार्टिन सिजो यांनी राहुल गांधी यांची डीएनए चाचणी केल्याचे हे वृत्तपत्राचे कात्रण बनावट आहे. डॉ. मार्टिन सिजो यांनी कुठे आणि कधी पत्रकार परिषद घेतली याची कोणतीही माहिती कुठेही आढळून येत नाही. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणी : राहुल गांधी हे राजीव गांधींचे पुत्र नाहीत?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False