Fact Check: कुंभमेळ्यातील व्हिडिओ CAA समर्थन रॅलीचा म्हणून व्हायरल. पाहा सत्य

False राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी  (एनआरसी) विरोधात आणि समर्थनार्थ आंदोलने होत आहे. नागा साधू संत CAA-NRC कायद्याचे समर्थन करत असल्याचा म्हणून एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली आहे.

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुकArchive

तथ्य पडताळणी

व्हिडियोतील की-फ्रेम्सला यांडेक्स रिव्हर्स इमेज सर्च केले. यातून 10 मार्च 2019 रोजी “यूट्यूब जंक्शन” द्वारे प्रसारित करण्यात आलेला एक व्हिडिओ आढळला. या व्हिडिओच्या शीर्षकात हे कुंभमेळ्याच्या समारोपाचे हे द्दश्य असल्याचे म्हटले आहे. 

हाच व्हिडिओ विस्तृत स्वरुपात युटयूबवरही उपलब्ध असल्याचे दिसून येते. तो 5 मार्च 2019 रोजी अपलोड करण्यात आलेला आहे. या व्हिडिओच्या शीर्षकात प्रयागराज कुंभमेळा 2019 असे म्हटलेले आहे. 

“यूट्यूब जंक्शन” द्वारे प्रसारित करण्यात आलेला व्हिडिओ आणि समाजमाध्यमात नागा साधूंनी सीएएच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीचा व्हिडिओ एकच असल्याचे दिसून येते. दोन्ही व्हिडिओची तुलना खाली केलेली आहे. 

निष्कर्ष

नागा साधू-संतांनी CAA-NRC च्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीचा हा व्हिडिओ नाही. प्रयागराज येथील 2019 मधील कुंभमेळ्यातील नागा साधुंचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे या पोस्टमधील दावा फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळला आहे.

Avatar

Title:Fact Check: कुंभमेळ्यातील व्हिडिओ CAA समर्थन रॅलीचा म्हणून व्हायरल. पाहा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •