Fact Check : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ब्रिटनच्या राणीला मानवंदना देतानाचे हे छायाचित्र खरे आहे का?

False राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ब्रिटीश राणीला मानवंदना देतानाचा म्हणून एक कृष्णधवल फोटो सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. कृष्णधवल असलेले हे छायाचित्र प्रथमदर्शनी तरी खरे वाटते. पवार ए आर यांनी ब्रिटीश राणीला मानवंदना देताना देशप्रेमी अशी माहिती देत हा फोटो पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या माहितीची तथ्य पडताळणी केली आहे.

screenshot-www.facebook.com-2019.11.18-10_33_25.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट 

तथ्य पडताळणी 

हा फोटो खरोखरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ब्रिटीश राणीला मानवंदना देतानाचा आहे का, याची माहिती घेण्यासाठी आम्ही तो रिव्हर्स इमेजने शोधला. त्याचा जो परिणाम आम्हाला मिळाला यात एक छायाचित्र आम्हाला दिसून आले. यात ब्रिटीश राणी दिसत असली तरी स्वयंसेवक मात्र दिसत नव्हते. हे छायाचित्र आपण खाली पाहू शकता.

queen.jpg

इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार हे 1956 मध्ये घेण्यात आलेले असून ब्रिटनच्या महाराणींना नायजेरिन सैनिक मानवंदना देत आहेत. त्यानंतर प्रश्न होता तो या छायाचित्रात मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कुठून आले. त्यानंतर आम्ही आमचा तपास आणखी पुढे नेला. त्यावेळी डेक्कन क्रॉनिकल या इंग्रजी दैनिकाच्या संकेतस्थळाने 26 जानेवारी 2016 रोजी दिलेल्या एका लेखात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाचे एक छायाचित्र वापरल्याचे दिसून आले. हेच स्वयंसेवक ब्रिटनच्या महाराणींना मानवंदना देतानाच्या समाजमाध्यमातील छायाचित्रात दिसत आहेत. हे छायाचित्र आपण खाली पाहू शकता. पीटीआय या वृत्तसंस्थेचे हे मुळ छायाचित्र असल्याचे डेक्कन क्रॉनिकलने म्हटले आहे.

dc-Cover-20160126013147.Medi.jpg

(छायाचित्र सौजन्य : डेक्कन क्रॉनिकल / Archive)

या संशोधनातून ही बाब स्पष्ट झाली की, दोन वेगळी छायाचित्रे संपादित करुन समाजमाध्यमात पसरत असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ब्रिटीश राणीला मानवंदना देतानाचे हे छायाचित्र तयार करण्यात आले आहे. 

निष्कर्ष

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ब्रिटनच्या राणीला मानवंदना देतानाचे हे छायाचित्र दोन वेगळी छायाचित्रे संपादित करुन तयार करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ब्रिटनच्या राणीला मानवंदना दिल्याचेही आढळून आलेले नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ब्रिटनच्या राणीला मानवंदना देतानाचे हे छायाचित्र खरे आहे का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •