मध्यप्रदेशमधील रेल्वे क्रॉसिंगवरील अपघात लासलगावच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

रेल्वे क्रॉसिंगवरील एका भीषण अपघाताचे दोन सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नियंत्रण सुटल्यामुळे एक भरधाव ट्रकने रेल्वे फाटकाजवळ उभ्या एका जीपला जोरदार धडक मारली आणि त्यात एक महिलादेखील चिरडल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.

दावा केला जात आहे की, हा अपघात लासलगाव (जि. नाशिक) येथे झाला.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. हे व्हिडिओ मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात झालेल्या अपघाताचे आहेत.

काय आहे दावा?

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअप चॅटबॉट क्रमांकावर (9049053770) हे व्हिडियो पाठवून पडताळणी करण्याची विनंती केली. 

वेगवेगळ्या अँगलच्या या दोन्ही व्हिडियोमध्ये दिसते की, रेल्वे क्रॉसिंगवर तीन बाईक आणि एक जीप उभी आहे. अचानक मागच्या बाजून एक ट्रक भरधाव वेगाने येत असल्याचे पाहून जीपचा चालक खाली उतरून पळतो. उभ्या असलेल्या जीपला ट्रकची एवढी जबर धडक बसते की, दोन्ही वाहने रेल्वेचे गेट तोडून दुसऱ्या बाजूला जातात. या अपघातामध्ये एक महिला चिरडल्या गेल्याचे दिसते.

हाच व्हिडियो फेसबुक आणि युट्युबवर वरही शेयर करण्यात आला आहे. वैभव पवार नामक अकाउंटवरील व्हिडिओमध्ये ही घटना लासलगावची म्हटली आहे.

फेसबुक

तथ्य पडताळणी

व्हिडियोचे बारकाईने निरीक्षण केल्यावर जीपचा वाहनक्रमांक (MP) मध्य प्रदेशचा आहे. हा धागा पकडून मग मध्य प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर असा काही अपघात झाला का याचा की-वर्ड्सद्वारे शोध घेतला.

युट्युबवर या अपघाताचे अनेक व्हिडियो उपलब्ध असल्याचे कळाले. लेटेस्टली, दैनिक सवेरा आणि IBC 24 या वृत्तवाहिनीने 3 सप्टेंबर रोजी या घटनेविषयी दिलेल्या बातमीनुसार, हा अपघात मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात घडला होता. एका भरधाव ट्रकने जीपला धडक देत रेल्वे क्रॉसिंगचे फाटक तोडले होते. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. 

‘दैनिक भास्कर’च्या बातमीनुसार, मध्य प्रदेशमधील सागर-खुरई रोडवरील जरूआखेड़ा येथील ठाकुर बाबा मंदिरच्या जवळ 3 सप्टेंबर रोजी सकाळी हा अपघात झाला होता. ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला. अपघातनंतर गेटमनने लगेच लाल झेंडी दाखवत येणाऱ्या रेल्वे मालगडीला अपघातस्थळापासून 100 मी अंतरावरच थांबविले. घटनास्थळाहून ट्रकचालक पळून गेला होता.

मूळ बातमी येथे वाचा – दैनिक भास्कर

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, रेल्वे क्रॉसिंगवरील ट्रक-जीपचा अपघात मध्य प्रदेशमधील आहे. तो चुकीच्या महितीसह लासलगाव येथील असल्याचा दावा केला जात आहे.

Avatar

Title:मध्यप्रदेशमधील रेल्वे क्रॉसिंगवरील अपघात लासलगावच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •