
अर्णब हा महाराष्ट्र आहे इथे पोलीस टायरमध्ये घालून आणि मिरच्यांची धुरी देऊन मारतात, अशा माहितीसह समाजमाध्यमात सध्या काही छायाचित्रे व्हायरल होत आहेत. ही छायाचित्रे अर्णब गोस्वामी यांची आहेत का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
काय आहे दावा?
अर्णब गोस्वामी यांची ही छायाचित्रे आहेत.
तथ्य पडताळणी
अर्णब गोस्वामी यांची ही छायाचित्रे आहेत का, याचा शोध घेतला. त्यावेळी न्यूज 18 च्या संकेतस्थळावर 10 जानेवारी 2020 रोजी प्रकाशित झालेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात एका पोलीस ठाण्यात युवकाला पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या घटनेतील ही द्दश्ये आहेत.
त्यानंतर एनडीटीव्हीने 4 जानेवारी 2020 रोजी याबाबत दिलेले वृत्त युटुयुबवर दिसून आले. उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील पोलिसांच्या कौर्याचा हा व्हिडिओ असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीवर मोबाईल चोरीचा आरोप होता. या प्रकरणात तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
निष्कर्ष
अर्णब गोस्वामी यांची ही छायाचित्रे असल्याचा दावा असत्य आहे. उत्तर प्रदेशातील देवरिया येथील एका घटनेची ही छायाचित्रे आहेत.

Title:अर्णब गोस्वामी यांची ही छायाचित्रे असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
