FACT-CHECK: ममता बॅनर्जी यांची आई मुस्लिम होती का? जाणून घ्या सत्य

False राजकारण | Politics

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आई मुस्लिम होती, असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. ममता बॅनर्जीदेखील आईच्या धर्मानुसारच आचरण करत असल्याचे म्हटले जातेय. त्याचा पुरावा म्हणून एक जुना फोटोदेखील शेयर केला आहे, ज्यामध्ये ममता बॅनर्जी ज्योती बासू यांना “सलाम” करताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली आहे. 

काय आहे पोस्टमध्ये?

“ममता बॅनर्जी यांची आई मुस्लिम होती. त्यामुळे ममता मुस्लिम धर्माचे पालन करत आहेत. त्या ज्योती बासू यांनाही आदाब करत आहेत. त्याची पदव्युत्तर पदवी इस्लामचा इतिहास याच विषयात होती. माझा प्रश्न आहे की, त्या हिंदू नाव स्वीकारत हिंदूंचा विश्वासघात का करत आहेत” (मराठी भाषांतर)

Mamta Mother claim.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांच्या आईचे नाव गायत्री बॅनर्जी आहे. 2011 साली त्यांचे निधन झाल्यावर विविध वृत्तस्थळांनी दिलेल्या बातम्यांमध्येसुद्धा त्यांचे नाव गायत्री असल्याचे म्हटले आहे. द हिंदुच्या बातमीत तर गायत्री बॅनर्जी यांच्या पार्थिवाला अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे दिले आहे.

मूळ बातमी येथे वाचा – द हिंदू

एनडीटीव्हीच्या बातमीनुसार, ममता बॅनर्जी एकदा म्हणाल्या होत्या की, त्यांची आई त्यांना दररोजच्या खर्चासाठी दहा रुपये तर दिल्लीला जाण्यासाठी शंभर रुपये द्यायच्या. या पैशातून त्या कालीमातेच्या वार्षिक पूजेचा खर्च करीत असे. यातून हे स्पष्ट होते की, ममता बॅनर्जी हिंदू धर्माशी निगडित बाबींचे पालन करत होत्या.

image1.jpg

एनडीटीव्हीने दिलेले सविस्तर वृत्त / Archive

शुतपा पॉल नावाच्या एका लेखिकेने Didi: The Untold Mamata Banerjee हे पुस्तक लिहिलेले आहे. फॅक्ट क्रेसेंडो हिंदीशी बोतलाना त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या मुस्लिम होण्याविषयीचा दावा फेटाळून लावला होता. फॅक्ट क्रेसेंडोला पाठवलेल्या इमेलमध्ये त्यांनी लिहिले की, माझ्या संशोधनात ममता बॅनर्जी मुस्लिम आहेत, अशी कोणतीही गोष्ट समोर आली नाही. त्या कालीमाताच्या भक्त आहेत आणि त्या मातेच्या वार्षिक पुजेत सहभागी होतात, ही बाब सर्वज्ञात आहे. त्यांनी आयोजित केलेल्या पुजेत अनेक मान्यवर व्यक्ती सहभागी होतात. त्या श्लोकांचेही अतिशय स्पष्ट उच्चार करतात. त्यांनी अनेकदा रॅलीतही चंडीपाठ जप केला आहे. मी त्यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेत आणि महाविद्यालयातही गेले आहे. त्यांच्या शिक्षकांशीही बोलले आहे. यापैकी कुणीही त्या मुस्लिम असल्याचा उल्लेख केलेला नाही. त्यांच्या आईचे अंत्यसंस्कारही हिंदू रिती-रिवाजानुसार झाले आहेत. (मराठी भाषांतर)

image7.jpg

सदरील छायाचित्र गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, ज्योती बासू आणि ममता बॅनर्जी यांचा हा फोटो एक जुलै 1991 रोजी कोलकाता येथील रायटर्स इमारतीमध्ये झालेल्या भेटीचा आहे.

निष्कर्ष

या संशोधनातून स्पष्ट होते की, ममता बॅनर्जी यांची आई मुस्लिम नव्हती. त्यांचे अंत्यसंस्कारही हिंदू पद्धतीने करण्यात आले होते. ममता बॅनर्जी हिंदू रितीरिवाज पाळतात. त्यामुळे ममता बॅनर्जी किंवा त्यांची आई मुस्लिम आहेत असा दावा चूक ठरतो.

Avatar

Title:FACT-CHECK: ममता बॅनर्जी यांची आई मुस्लिम होती का? जाणून घ्या सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False