Fact Check : साळींदर बिबटयातील हा संघर्ष नेमका कुठे घडला?

False सामाजिक

साळींदर आणि बिबट्या यातील संघर्ष पहा दाजीपुर अभयारण्य (ता. राधानगरी) जिल्हा कोल्हापुर…हे पाहायला नशिब लागते..कारवाल्याची मेहेरबानी अशी माहिती Gundaye Manoj यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive

वेगवेगळ्या दाव्यासह ही पोस्ट पसरत असल्याचेही आपण खाली पाहू शकता.

तथ्य पडताळणी 

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात असणाऱ्या दाजीपूर अभयारण्यात अशी घटना घडली आहे का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही याबाबत मराठी माध्यमांमध्ये काही वृत्त आले आहे का याचा शोध घेतला. त्यावेळी असे वृत्त दिसून आले नाही. या व्हिडिओतील छायाचित्र घेत ती रिव्हर्स इमेज सर्च केली. त्यावेळी आम्हाला जो परिणाम मिळाला त्यात हा व्हिडिओ आम्हाला दक्षिण आफ्रिकेतील असल्याचे दिसून आले. दक्षिण आफ्रिकेतील क्रूगर राष्ट्रीय उद्यानातील जीवरक्षक गॅरेट मेयर यांनी हे चित्रीकरण केलेले आहे. केटरज न्यूज यांच्याकडे या व्हिडिओचे हक्क आहेत. आपण त्यांनी याबाबत दिलेली माहिती आणि त्यांचा मूळ व्हिडिओ आपण खाली पाहू शकता. 4 सप्टेंबर 2019 रोजी हा व्हिडिओ प्रसिध्द करण्यात आलेला आहे. 

हाच व्हिडिओ 27 ऑगस्ट 2019 रोजी Africa Geography या फेसबुक पेजवरही प्रसिध्द करण्यात आल्याचे आपण खाली पाहू शकता. 

त्यांनी या व्हिडिओचे श्रेय सेओलो आफ्रिकेला दिले आहे. सेओलो आफ्रिका दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेमध्ये पर्यटकांसाठी कार्यरत असलेली एक संस्था आहे. त्यांनी याबाबतचा एक लेखही आपल्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे. 

Seolo Africa / Archived Link

निष्कर्ष 

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात असणाऱ्या दाजीपूर अभयारण्यातील साळींदर आणि बिबट्याच्या संघर्षाचा हा व्हिडिओ नाही. दक्षिण आफ्रिकेतील क्रूगर राष्ट्रीय उद्यानातील हा व्हिडिओ आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात असणाऱ्या दाजीपूर अभयारण्यातील साळींदर आणि बिबट्याच्या संघर्षाचा हा व्हिडिओ असल्याचा दावा असत्य आढळला आहे. 

Avatar

Title:Fact Check : साळींदर बिबटयातील हा संघर्ष नेमका कुठे घडला?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False