Fact Check : हा तरंगता पूल दक्षिण अमेरिकेतील आहे का?

False आंतरराष्ट्रीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेत एक तरंगता पुल आहे, या पुलाला अभियांत्रिकी शास्त्रातील एक चमत्कारच म्हणावा लागेल, अशी माहिती देत रुपा कुलकर्णी यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा पूल खरोखरच दक्षिण अमेरिकेतील आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. 

फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive

तथ्य पडताळणी 

हा तरंगता पूल नेमका कुठला आहे हे शोधण्यासाठी आम्ही “Wave bridge in Ecuador” असा शब्दप्रयोग केला. त्यावेळी आम्हाला खालील परिणाम प्राप्त झाला. या परिणामातून हे स्पष्ट झाले की, हा व्हिडिओ अतिशय दीर्घकाळापासून समाजमाध्यमात पसरत आहे. हाच व्हिडिओ आम्हाला युटूयूबवरही प्राप्त झाला. TheAloversconcerto नावाच्या वापरकर्त्याने 29 जुलै 2012 रोजी अपलोड केलेला आहे. “Jetty @ Centara Grand Beach Resort & Villas Krabi”  या शीर्षकाद्वारे तो अपलोड करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ थायलंडचा असल्याचे या ठिकाणी म्हटलेले आहे. 

याशिवाय Savannah Rose नावाच्या वापरकर्त्यानेही 26 जानेवारी 2011 रोजी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. यातील दृश्ये वेगळ्या कोनातून घेण्यात आल्याचे दिसून येते. यातही हा तरंगता पूल थायलंड येथील असल्याचा उल्लेख आहे. 

समुद्रातील महाकाय लाटांमुळे दोन स्पीडबोट वाहून गेल्याचे वृत्त thairath.co.th

या थायलंडमधील संकेतस्थळाने 13 जून 2014 रोजी दिले आहे. या वृत्तातही आपण हा तरंगता पूल स्पष्ट पाहू शकता. 

image4.png

thairath.co.th / Archive

या व्यतिरिक्त drizzlinghappiness.com या संकेतस्थळाने BRIDGE OF TERROR @ KRABI THAILAND या शीर्षकाने एक लेख दिला आहे. या लेखात पुलाचा व्हिडिओ देण्यात आला असून त्याची वैशिष्टये सांगण्यात आली आहेत. 

image1.png

drizzlinghappiness.com / Archive

या संशोधनातून ही बाब स्पष्ट होत आहे की या व्हिडिओतील तरंगता पूल दक्षिण अमेरिकेतील नसून थायलंडमधील आहे.

निष्कर्ष

या व्हिडिओतील तरंगता पूल थायलडमधील आहे. या पोस्टमध्ये करण्यात आलेला हा पूल दक्षिण अमेरिकेतील असल्याचा दावा फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळला आहे.

Avatar

Title:Fact Check : हा तरंगता पूल दक्षिण अमेरिकेतील आहे का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •