FACT CHECK: नरेंद्र मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांनी CAA विरोधात आंदोलन केले का? वाचा सत्य

False राजकीय

गेल्या काही दिवसांपासून सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवहीच्या (NRC) विरोधातील आंदोलनांचे दिल्लीतील शाहीन बाग केंद्र बनले आहे. सर्व वयोगटातील लोक येथे दिवसरात्र बसून नव्या कायद्याचा विरोध करीत आहेत. 

शहीन बाग येथील या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्नी जशोदाबेन यांनीसुद्धा सहभाग घेतल्याचा दावा एका फोटोद्वारे केल जात आहे. मग खरंच जशोदाबेन सीएए विरोधात आंदोलनास बसल्या आहेत का? फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली. 

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

या फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळते की, जशोदाबेन सीएए विरोधात आंदोलन करीत नाहीत. हा फोटो जुना आहे.

‘डेक्कन क्रोनिकल’च्या 13 फेब्रुवारी 2016 रोजीच्या बातमीनुसार, पावसाळ्यात मुंबईतील झोपडपट्ट्या पाडू नये या मागण्यासाठी गुड समिरटन मिशनतर्फे (जीएसएम) आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये जशोदाबेन यांनी एक दिवसीय उपोषण केले होते. हा फोटो त्यावेळीचा आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – डेक्कन कोनिकल्सअर्काइव्ह

‘दि हिंदू’च्या बातमीतही या आंदोलनातील फोटो दिलेले आहेत. पीटर पॉल राज यांनी हे आंदोलन आयोजित केले होते. राज यांनी विक्रोळी येथे गुड समिरटन मिशन हे संस्था 1994 साली स्थापन केली होती. मुंबईतील अनाथ व गरीब मुलांच्या हक्कांसाठी ही संस्था काम करते. त्यांनी जशोदाबेन यांना आमंत्रित केले होते. त्यानुसार, जशोदाबेन यांनी एकदिवसीय उपोषण करीत आपला पाठिंबा दर्शविला होता.

मूळ बातमी येथे वाचा – द हिंदूअर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, जशोदाबेनचा हा फोटो जूना असून, शहीन बाग येथील सीएए आंदोलनाशी त्याचा काही संबंध नाही. मुंबईतील झोपडपट्टी पाडण्याविरोधात जशोदाबेन यांनी आझाद मैदानावर 2016 साली केलेल्या आंदोलनाचा हा फोटो आहे. 

Avatar

Title:FACT CHECK: नरेंद्र मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांनी CAA विरोधात आंदोलन केले का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False