महाराष्ट्रातील या प्रमुख नेत्यांनी एकत्रित ‘तान्हाजी’ चित्रपट पाहिला का? काय आहे सत्य या फोटोचे?

False राजकीय | Political

तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवत आहे. सोशल मीडियावरील एका व्हायरल फोटोद्वारे दावा केला जात आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकत्र हा चित्रपट पाहिला. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची तथ्य पडताळणी केली आहे.

screenshot-www.facebook.com-2020.01.20-13_30_42.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी

सदरील फोटोला रिव्हर्स इमेज केल्यावर ‘आज तक’ वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावरील 28 जानेवारी 2019 रोजीचे एक वृत्त आढळले. त्यानुसार,  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या प्रचारासाठी आयोजित एका कार्यक्रमानिमित्त हे सर्व नेते एकत्र आले होते. हा फोटो तेव्हाचा आहे.

screenshot-aajtak.intoday.in-2020.01.20-15_24_47.png

मूळ बातमी येथे वाचा आज तक / Archive 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरूनदेखील 14 जानेवारी 2019 रोजी कलर्स मराठी वाहिनीच्या ‘मानाचा मुजरा-बाळासाहेब ठाकरे’ या कार्यक्रमातील फोटो शेयर करण्यात आले होते. यावेळी शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि अन्य मान्यवर उपस्थित राहिल्याचे म्हटले आहे.

Archive

निष्कर्ष

यातून हे स्पष्ट होते की, हे छायाचित्र ‘तान्हाजी’ हा चित्रपट पाहतानाचे नाही. हे छायाचित्र 2019 मध्ये ‘मानाचा मुजरा-बाळासाहेब ठाकरे’ या कार्यक्रमातील आहेत. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:महाराष्ट्रातील या प्रमुख नेत्यांनी एकत्रित ‘तान्हाजी’ चित्रपट पाहिला का? काय आहे सत्य या फोटोचे?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False