संघ शाखात 44 टक्क्यांहून अधिक वाढ झाली का? : सत्य पडताळणी

True सामाजिक

(Image is only for Representation purpose only . source E khabar today )

संघ शाखात 44 टक्क्यांची वाढ झाली या विषयावरील एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पोस्ट फेसबुकवरील श्रीमंत दामोदरपंत या अकाउंटवर फॅक्ट क्रिसेंडोच्या टीमने सत्य पडताळणी करेपर्यंत 137 शेअर 225 लाईक्स आणि 13 कमेंटस् मिळाले आहेत.

फेसबुक

अर्काईव्ह

सत्य पडताळणी

व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये संघ शाखेत 44 टक्क्यांपेक्षा वाढ असा उल्लेख असल्याकारणाने सर्वात प्रथम गुगलवर संघ शाखेत 44 टक्के वाढ असे शोधल्यावर खालील रिझल्ट समोर आले.

या विषयावर विविध वृत्तपत्रांमध्येही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर वृत्त वाचू शकता.

दैनिक लोकमतअर्काईव्ह

खोज मास्टरअर्काईव्ह

सौजन्य – दैनिक लोकमत

सौजन्य – खोज मास्टर

त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत केव्हापासून वाढ होत आहे हे तपासण्यासाठी आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑफिशिअल वेबसाईटवरुन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. या वेबसाईटवर क्रोनोलॉजी या विभागाला क्लिक केल्यानंतर येथे 2011 पासून 2019 पर्यंतचा संघ कार्यालयाचा ऑफिशिअल वार्षिक रिपोर्ट येतो.

RSS l अर्काईव्ह

क्रोनोलॉजी या विभागात 2012 चा वार्षिक अहवाल देण्यात आला आहे.

2012 RSS Annual Report

क्रोनोलॉजी या विभागात 2014 च्या वार्षिक अहवालात संपुर्ण भारतात 44 हजार 982 शाखा आहेत असे सांगितले आहे.

त्यानंतर 2017 च्या वार्षिक अहवालात संघ शाखेत वाढ झाल्याचं स्वतः सरकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी सांगितले आहे. याबद्दलचा एक व्हिडिओ आरएसएसच्या वेबसाइटवर 18 ऑक्टोबर 2017 रोजी अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये 0.21 सेकंदापासून 2.35 मिनिटांपर्यंत सध्या देशात 57 हजार 185 शाखा सुरु आहेत अशी माहिती त्यांनी स्वतः सांगितली.

तसेच युट्युब VSK Tamilnadu  या चॅनलवर 19 मार्च 2017 रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. माध्यमांना माहिती सांगतानाचा व्हिडिओ खाली आपण सविस्तर पाहू शकता.

अर्काईव्ह

त्याचप्रमाणे RSS च्या वेबसाईटवर 2018 आणि 2019 या दोन वर्षांचा शाखा विस्ताराचा रिपोर्ट देण्यात आला आहे.

एकंदरीत सर्व आकड्यांचा विचार करता मागच्या आठ वर्षांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या शाखेमध्ये 44 ट्क्के वाढ झाली आहे.

निष्कर्ष :  सोशल मीडियावर व्हायरल होणारी संघ शाखात 44 टक्के वाढ ही पोस्ट खरी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑफिशिअल वेबसाईटवरुन पडताळणी केल्यानंतर 44 ट्क्के हा आकडा येतो. त्यामुळे फॅक्ट क्रिसेंडोच्या पडताळणीत संघ शाखात 44 टक्के वाढ हे तथ्य खरे आढळले आहे.

Avatar

Title:संघ शाखात 44 टक्क्यांहून अधिक वाढ झाली का? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: True