नरेंद्र मोदी यांनी गौतम अडाणी यांच्या पत्नीसमोर झुकून नमस्कार केला का? वाचा सत्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी एका महिलेसमोर वाकून प्रणाम करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेयर करून दावा केला जात आहे की, ही महिला म्हणजे उद्योगपती गौतम अडाणी यांची पत्नी प्रीति अडाणी आहे. या फोटोवरून अनेकांनी म्हटले की, मोदी यांनी अडाणी यांच्या पत्नीला झुकून प्रणाम केला. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली.
काय आहे पोस्टमध्ये?
पोस्टमध्ये म्हटले की, मित्रांनो या फोटोमध्ये जी महिला दिसत आहे ती अडाणी यांची पत्नी आहे आणि जे तिच्यासमोर वाकलेले आहेत ते भारताचे पंतप्रधान आहेत. किमान पदाचा तरी मान राखायला पाहिजे होता.
मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक
तथ्य पडताळणी
सदरील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर 2014 मध्ये जेव्हा कर्नाटकमधील तुमकुर येथे फूड पार्कच्या उद्घाटानासाठी गेले होते तेव्हाचा हा फोटो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तुमकूर येथील हेलिपॅडवर आगमन झाल्यावर स्थानिक महापौर गीता रुद्रेश, जीवपीचे कार्यकारी अध्यक्ष गोविंदराजू, अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. आनंदू यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मूळ बातमी येथे वाचा – विजय कर्नाटका । अर्काइव्ह
वनइंडियाच्या कन्नड भाषेतील वेबसाईटवर पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्याची लाईव्ह माहिती देण्यात आली होती. प्रत्येक क्षणाला ते कुठे-कुठे होते याची वेळेनुसार रिपोर्टिंग करण्यात आली होती. त्यानुसार, सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी पंतप्रधान तुमकुर येथी विवि हेलिपॅड येथे पोहोचले. तेव्हा त्यांचे महापौर गीता रुद्रेश यांनी स्वागत केले.
मूळ बातमी येथे वाचा – वन इंडिया । अर्काइव्ह
फॅक्ट क्रेसेंडोने तुमकुरच्या विद्यमान महापौर ललिता रविश यांच्याशी संपर्क केला. सदरील फोटो पाहिल्यानंतर त्यांनी ही महिला माजी महापौर गीता रुद्रेश असल्याचे सांगितले.
या फोटोचे फॅक्ट क्रेसेंडो हिंदी आणि मल्याळमने यापूर्वी फॅक्ट चेक केले आहे.
निष्कर्ष
यावरून हे सिद्ध होते की, पंतप्रधान मोदी यांनी अडाणी यांच्या पत्नीला नाही तर, तुमकुरच्या महापौर गीता रुद्रेश यांना नमस्कार करत असतानाचा हा फोटो आहे. त्यामुळे सदरील पोस्टमधील दावा असत्य आहे.
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:नरेंद्र मोदी यांनी गौतम अडाणी यांच्या पत्नीसमोर झुकून नमस्कार केला का? वाचा सत्य
Fact Check By: Agastya Deokar
Result: False