अक्षरधाम मंदिराचे फोटो आयोध्यातील संभाव्य राम मंदिर म्हणून व्हायरल. वाचा सत्य

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आयोध्यातील विवादित रामजन्मभूमीचा वाद मिटला असून, कोर्टाच्या आदेशाने तेथे राम मंदिर बांधण्यात येणार आहे. हे मंदिर कसे असेल याविषयी अनेकांना उत्सुकता आहे. या संभाव्य मंदिराचे चित्र म्हणून सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला जात आहे. परंतु, हा फोटो राम मंदिराचा नसून, दिल्लीस्थित अक्षरधाम मंदिराचा आहे.

काय आहे पोस्टमध्ये?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम या फोटो रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हे संभाव्य राम मंदिर नाही. हा फोटो दिल्लीतील स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराचा आहे. 

मंदिराची अधिकृत वेबसाईट – अक्षरधाम मंदिर

श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था यांच्यातर्फे हे मंदिर बांधण्यात आले. तत्कालिन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या उपस्थितीत 2005 साली या मंदिराचे लोकार्पण करण्यात आले होते. या मंदिराच्या निर्माणासाठी पाच वर्षांचा कालावधी आणि 7 हजार कारागीरांचे हाथ लागले. 

मूळ वेबसाईट – AirPano

2017 साली ऑस्ट्रेलियाचे तत्कालिन पंतप्रधान माल्कम टर्नबुल भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा नरेंद्र मोदी यांनी त्यांना अक्षरधाम मंदिरात नेले होते. मंदिरात दोघांच्या हस्ते पूजादेखील करण्यात आली. दोघांनी मंदिर परिसरात फेरफटकादेखील मारला. याच व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.

यावरून हे स्पष्ट होते की, सोशल मीडियावर पसरत असलेला फोटो आयोध्यातील संभाव्य राम मंदिराचा नाही. हा फोटो दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराचा आहे. गुगल मॅपवरदेखील हे मंदिराला पाहाता येईल

मूळ मॅप येथे पाहा – गुगल मॅप

Avatar

Title:अक्षरधाम मंदिराचे फोटो आयोध्यातील संभाव्य राम मंदिर म्हणून व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •