राष्ट्रवादी आणि बसपाला दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात एकसारखीच मते मिळाली का? वाचा सत्य

False राजकीय

नुकतेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये दोन वेगवेगळ्या मतदारसंघातील दोन पक्षांच्या उमेदवारांना एकसारखीच मते मिळाल्याचा दावा करून ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. गडचिरोली आणि वाशिम जिल्ह्यातील तिरोरा आणि कारंजा मतदारसंघातील निकालांची आकडेवारी एकसारखीच असल्याच एक फोटो शेयर होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली.

काय आहे पोस्टमध्ये?

वृत्तपत्रातील निकालाच्या आकडेवारीचा एक फोटो फेसबुकवर शेयर केला जात आहे. यामध्ये तिरोरा आणि कारंजा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांना अनुक्रमे 50,481 आणि 41,907 मते मिळाल्याचे दिसते. यावरून म्हटले की, हा बघा EVM घोटाळा…! पुराव्यांसह…! गडचिरोली जिल्ह्यातील एक मतदारसंघ आणि वाशिम जिल्ह्यातील दुसरा मतदारसंघ…! राष्ट्रवादी आणि बसपा…! मतें एकदम सेम टू सेम….! कसं शक्य आहे..??

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

दोन वेगवेगळ्या मतदारसंघातील दोन पक्षांच्या उमेदवारांना खरंच एकसारखीच मते मिळाली का हे पडताळण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील निकाल तपासला. त्यातून वेगळेच तथ्य समोर आले. एक-एक मतदारसंघाच्या निकालांचे विश्लेषण खाली केले आहे.

1. तिरोरा मतदारसंघ

पोस्टमधील दावाः तिरोरा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या रविकांत बोपचे यांना 50 हजार 481 मते मिळाली, तर बसपाच्या दिलीप बनसोड यांना 41 हजार 907 मते प्राप्त झाली.

सत्यः निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित आकडेवारीनुसार, राष्ट्रवादीला 50 हजार 519 मते मिळाली. विशेष म्हणजे बसपाच्या उमेदवाराचे नाव बाबुलाल कमल आहे. दिलीप बनसोडे हे अपक्ष निवडणूक लढले होते. निकालाअंती बसपाला 2525 मते तर दिलीप बनसोड यांना 33 हजार 33 हजार 183 मते पडली.

मूळ निकाल येथे पाहा – तिरोरा विधानसभा निकाल

2. कारंजा मतदारसंघ

पोस्टमधील दावाः कारंजा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या प्रकाश डहाके यांना 50 हजार 481 मते मिळाली, तर बसपाच्या युसूफ पुंजानी यांना 41 हजार 907 मते प्राप्त झाली. 

सत्य: निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित आकडेवारीनुसार ही आकडेवारी बरोबर आहे.

मूळ निकाल येथे पाहा – कारंजा विधानसभा निकाल

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, तिरोरा आणि कारंजा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपाच्या उमेदवारांना एकसारखीच मते मिळालेली नाहीत. त्यामुळे ही पोस्टमधील दावा असत्य आहे.

Avatar

Title:राष्ट्रवादी आणि बसपाला दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात एकसारखीच मते मिळाली का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False