
जगन्नाथ पुरी येथील शालीग्राम आहे. पृथ्वीवर महामारी आल्यास बाहेर दर्शनासाठी काढला जातो. 1920 साली काढला होता. आता 2020 चालु वर्षी काढला आहे. दर्शन दुर्मिळ आहे, अशा माहितीसह समाजमाध्यमात सध्या काही छायाचित्रे आणि व्हिडिओ पसरत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
पृथ्वीवर महामारी आल्यास जगन्नाथ पुरी येथील शालीग्राम बाहेर काढण्यात येतो का, 1920 साली आणि आत्ता 2020 मध्ये तो बाहेर काढण्यात आला आहे का, हे जाणून घेण्यासाठी जगन्नाथ पुरी मंदिरातील नाना दामोदर यांच्याशी फॅक्ट क्रेसेंडोने संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, जगन्नाथ मंदिरातील शाळीग्रामचा आकार मोठा आहे. नेपाळच्या राजाने मंदीर बांधले तेव्हा तो दान केलेला आहे. केवळ नेपाळमध्येच हा शाळीग्राम आढळतो. 1920 मध्ये स्पॅनिश फ्लू दरम्यान शालीग्राम दर्शनासाठी बाहेर काढण्यात आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
द न्यू इंडियन एक्स्प्रेसने 30 मार्च 2020 रोजी दिलेल्या वृत्तानुसार, पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिरातून नृसिंह प्रतिमा पालखीद्वारे नगर प्रदिक्षणेसाठी बाहेर काढण्यात आली होती. ही प्रतिमा दरवर्षी चैत्र महिन्याच्या चौथ्या दिवशी मंदिरातून बाहेर पडते आणि शहराची परिक्रमा करते. ही प्रतिमा भक्तांचे सर्व रोगांपासून संरक्षण करते, अशी भाविकांची श्रध्दा आहे.
द न्यू इंडियन एक्स्प्रेस / संग्रहित
स्पॅनिश फ्लूविषयीची अमेरिकेतील सेंटर फॉर डिजिज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 1917 मध्ये जगभरात 5 दशलक्ष लोक स्पॅनिश फ्लूमुळे मरण पावले.
निष्कर्ष
जगन्नाथ पुरी येथील शालीग्रामचे हे छायाचित्र असल्याचा दावा असत्य आहे.

Title:जगन्नाथ मंदिरातील महामारीच्या काळात बाहेर काढण्यात आलेला हा शालीग्राम आहे का? वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
