Rapid FC : छायाचित्रात रक्तबंबाळ झालेली ही तरुणी जेएनयूमधील विद्यार्थिनी नाही. हा फोटो लेबनॉनमधील आहे.

False सामाजिक

जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) वसतिगृहांमध्ये रविवारी (पाच जानेवारी) सायंकाळी अनेक विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली होती. तोंडाला कपडे बांधुन आलेल्या काही लोकांनी हा हल्ला केला होता. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. 

या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थिनीचा फोटो म्हणून एक छायाचित्र सोशल मीडियावर शेयर करण्यात येत आहे. परंतु, रक्तबंबाळ झालेली ही तरुणी जेएनयूमधील विद्यार्थिनी नाही. वाचा सत्य काय आहे…

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुक

सत्य काय आहे?

हा फोटो लेबनॉनमधील आहे. मोहरमच्या महिन्यातील दहाव्या दिवशी ‘आशुरा’ असतो. त्या दिवशी निघणाऱ्या मिरवणूकीतील हा फोटो आहे. यामध्ये मुस्लिमबांधव अणकुचीदार वस्तूने स्वतःला इजा पोहचवून प्रेषितांना अभिवादन करतात.

2005 पासून हा फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे जेएनयूमधील हल्ल्यात जखमी झालेली ही विद्यार्थिनी नाही.

फॅक्ट क्रेसेंडो मराठीने यापूर्वी या फोटोचे सत्य समोर आणलेले आहे. अधिक सविस्तर वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Fact Check : लेबनॉनमधील फोटो जेएनयूतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा म्हणून व्हायरल

Avatar

Title:Rapid FC : छायाचित्रात रक्तबंबाळ झालेली ही तरुणी जेएनयूमधील विद्यार्थिनी नाही. हा फोटो लेबनॉनमधील आहे.

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False