बख्तियार खिलजीच्या नावे ‘पीर बाबा की मजार’वर लोकं मन्नत मागतात का?

False सामाजिक

सोशल मीडियावर बख्तीयार खिलजी याच्याबद्दल एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये बख्तियार खिलजी याला मृत्युनंतर जेथे दफन करण्यात आले, त्याठिकाणाला आता पीर बाबा की मजार म्हटले जाते, असा दावा करण्यात आला आहे. या मजारवर लोक मन्नत मागतात असा दावाही करण्यात आला आहे. याविषयी फॅक्ट क्रिसेंडोने पडताळणी केली आहे. फेसबुकवर मनाचे टॉक्स या पेजवर ही पोस्ट व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे.

फेसबुक

अर्काईव्ह

सत्य पडताळणी

फेसबुकवर असणाऱ्या मनाचे टॉक्स या पेजवर आणि वेब पोर्टलवर बख्तियार खिलजी याच्याबद्दल माहिती दिली आहे. बख्तियार खिलजी याने नालंदा विश्वविद्यालय बेचिराख केले याविषयी माहिती सांगतांना त्याच्या मृत्यूनंतर त्याला जिथे दफन केले त्या जागेला आता ‘पीर बाबा की मजार’ म्हटले जाते असा दावा केला आहे. याशिवाय या पोस्टमध्ये त्या जागेवर लोकं मन्नत मागत डोकं टेकवतात असा दावा करण्यात आला आहे.

मनाचे टॉक्सअर्काईव्ह

बख्तियार खिलजी याचा मृत्यू कुठे झाला याविषयी सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आम्ही बख्तियार खिलजी याची दफन ठिकाण गुगलवर शोधले.  

त्यानंतर टेलेग्राफ इंडिया येथे क्लिक केल्यानंतर हे कळाले की बख्तियार खिलजी याला जिथे दफन केले आहे, त्या ठिकाणी 3 जानेवारी 2005 पर्यंत पीर बाबा की मजार तयार झालेली नाहीये. उलट भारतीय पुरातत्व खात्याचे या ऐतहासिक वास्तूकडे कसे दुर्लक्ष झाले आहे, आणि राज्य पुरातत्व खात्याकडूनही दुर्लक्ष झाले आहे.

टेलेग्राफ इंडियाअर्काईव्ह

बख्तियार खिलजी याच्या मृत्यूबद्दल आणि मृत्यूच्या जागेबद्दल वेगवेगळे संदर्भ आढळून आले आहेत. विकिपीडियामध्येही बख्तियार खिलजी याच्या मृत्यूबद्दल स्पष्ट सांगितले नाहीये.

विकिपीडियाअर्काईव्ह

खाली दिलेल्या लिंकवर आपण बख्तियार खिलजी याच्याबद्दल सविस्तर वाचू शकता. यापैकी कोणत्याही लिंकवर त्याच्या मृत्यूबद्दल स्पष्ट शब्दात माहिती दिलेली नाहीये.

बख्तियार खिलजी याचा मृत्यू इ.स.ख्रिस्तपुर्व 1206 वर्षी झाला. बख्तियार खिलजी याच्याबद्दल प्रवक्ता डॉट कॉम या वेब पोर्टलवर एका लेखात बख्तियार खिलजी याच्या मृत्यूनंतर मजार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच याविषयावर दैनिक जागरणमध्ये बातमी प्रसिद्ध झाली आहे असे म्हटले आहे.

प्रवक्ता डॉट कॉमअर्काईव्ह

दैनिक जागरणच्या वेबसाईटवर उपेक्षित है बख्तियार खिलजी की ऐतहासिक मजार असे टाईप केल्यानंतर कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही.

दैनिक जागरणअर्काईव्ह

मध्यकाल भारतीय इतिहास – भाग 1 या मध्ये 1206 इ.स. मध्ये बख्तियार खिलजी याचा मृत्यू झाल्याचा उल्लेख आहे. परंतू त्यानंतर तेथे कोणतीही पीर बाबा की मजार बनविण्यात आल्याचे पुरावे आढळून आले नाही.

मध्यकाल भारतीय इतिहास – भाग 1अर्काईव्ह

व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, बख्तियार खिलजी याच्या मृत्यूनंतर बख्तियारपूर येथे पीर बाबा की मजार बनविण्यात आली आहे. मध्यकाल भारतीय इतिहास – भाग 1 मध्ये बख्तियार खिलजी याचा मृत्यू तिबेट जवळील देवकोट जवळ झाल्याचा उल्लेख आहे. बख्तियार खान याचा मृत्यू बिहारमधील कैमुर जिल्हा मुख्यालयापासून 16 किलोमीटर अंतरावर चैनपूर येथे आहे. या ठिकाणी असलेली वास्तू ही संरक्षित स्मारक म्हणून भारतीय पुरातत्व खात्यामध्ये नोंद आहे. बिहार राज्यात असणाऱ्या कैमुर जिल्हा मुख्यालयापासून 16 किलोमीटर दूर चैनपूर येथे बख्तियार खिलजी याने बांधलेला मकबरा आहे. या मकबरा परिसरात बख्तियार खान याला मृत्यूनंतर दफन करण्यात आले आहे. या मकबरा परिसरात सुफी संत पीर उस्मान शाह यांची मजार आहे. त्याच परिसरात प्राचीन महावीर मंदिर देखिल आहे. याबद्दल दैनिक भास्कर या वृत्तपत्रात 29 नोव्हेंबर 2018 रोजी बातमी प्रसिद्ध झाली आहे. खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर वृत्त वाचू शकता.

दैनिक भास्करअर्काईव्ह

यासंदर्भात ईटीव्ही बिहार या युट्युब चॅनलवर 25 सप्टेंबर 2018 रोजी एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ बख्तियार खान याचा आहे. येथे सुफी संत पीर उस्मान शाह यांची मजार आहे. याठिकाणी अनेक श्रद्धाळू मन्नत मागण्यासाठी येत असतात. या व्हिडिओमध्ये 54 सेकंदापासून 1.05 सेकंदापर्यंत बख्तियार खान याच्या स्मारकाचा समावेश भारतीय पुरातत्व खात्याच्या संरक्षित वास्तू यासाठी करण्यात आला आहे, असा उल्लेख आहे.

तिबेटजवळ देवकोट परिसरात असणारी बख्तियार खिलजी याला दफन करण्यात आलेली कबर असून तेथे कोणतीही पीर बाबा की मजार नाही. त्यामुळे बिहारमध्ये चैनपुर येथील बख्तियार खिलजी याचा केवळ मकबरा आहे. आणि त्या परिसरात बख्तियार खिलजी याच्या नावाने पीर बाबा की मजार नसून, ती मजार सुफी संत पीर उस्मान शाह यांची आहे, हे दिसून येते.

खाली दिलेल्या युट्युब लिंकवर आपण बख्तियार खिलजी आणि बख्तियार खान या दोघांच्या मृत्यूनंतर दफन करण्यात आलेली वेगवेगळी जागा बघू शकता.

निष्कर्ष :  व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये बख्तियार खिलजी याच्या नावाने पीर बाबा की मजार आहे, आणि तेथे लोकं मन्नत मागण्यासाठी येतात असे म्हटले आहे. या विषयी फॅक्ट क्रिसेंडो टीमने जेव्हा सत्य पडताळणी केली तेव्हा असे आढळून आले आहे की, पीर बाबा की मजार ही बख्तियार खिलजीची नसून सुफी संत पीर उस्मान शाह यांची आहे. या मजारवर श्रद्धाळू मन्नत मागण्यासाठी येतात. त्यामुळे व्हायरल पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे बख्तियार खिलजी याच्या नावाने पीर बाबा की मजार आहे हे तथ्य खोटे आहे. बख्तियार खिलजी याच्या दफन केलेल्या जागेवर कोणीही मन्नत मागत नाही.

Avatar

Title:बख्तियार खिलजीच्या नावे ‘पीर बाबा की मजार’वर लोकं मन्नत मागतात का?

Fact Check By: Amruta Kale 

Result: False