लिंबाच्या रसाने कोरोना विषाणू नष्ट होत नाही; वाचा सत्य

Coronavirus False

फक्त एक रूपयात घरगुती पद्धतीने कोरोना विषाणू नष्ट होतो, असा दावा करणारा एक संदेश सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. आंध्र प्रदेशमधील रंगा व्यंकटेश्वर राव यांच्या नावाने हा संदेश व्हायरल होत असून त्यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याचा दावाही करण्यात येत आहे. 

या दाव्याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली असता, ही माहिती असत्य असल्याचे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

Lokasha.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित / संग्रहित

तथ्य पडताळणी

लिंबाच्या रसाने कोरोना नष्ट होतो, असा दावा करणारे रंगा व्यंकटेश्वर राव हे कोण आहेत, याचा शोध घेतला. 

हॅलो विझाग (संग्रहित) या संकेतस्थळावरील वृत्तानुसार आंध्र प्रदेशातील निनादावोल गावातील ते रहिवासी असून तेथील लायन्स क्लबचे ते सदस्य आहेत. त्यांनी लिंबाच्या रसाच्या सहाय्याने कोरोना विषाणू नष्ट होत असल्याचा दावा केला आहे. 

रंगा व्यंकटेश्वर राव यांच्याशी फॅक्ट क्रेसेंडोने संपर्क केला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, हे उपाय नाकातील संसर्ग दूर करण्यासाठी घरगुती प्रतिबंधात्मक स्वरूपाचे आहे. आरोग्यासाठी ते हानीकारकदेखील नाही. मी बक्षिसाची पाच लाखाची रक्कम जाहीर केलेली नाही. मला राष्ट्रपती पदक देखील मिळालेले नाही. नागरिकांमधील कोरोनाची भिती दूर व्हावी, यासाठी केवळ मी प्रयत्न करत असून त्यासाठी हा संदेश जारी केलेला आहे. 

लिंबाचा रस नाकपुंड्यामध्ये सोडल्यास खरोखरच कोरोनाचा विषाणू नष्ट होतो का, याबाबतच्या माहितीचा शोध घेतला. त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने लिंबाच्या रसाने कोरोना विषाणूला प्रतिबंध होत असल्याचा कोणताही पुरावा आढळला नसल्याचे स्पष्ट केल्याचे दिसून आले.

covid19-fact-or-fiction--lemon-turmeric.png

संग्रहित

हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या संकेतस्थळावरील माहितीनुसार लसून किंवा लिंबाचे घरगुती उपाय हे कोरोना विषाणूची लागण होण्यापासून प्रतिबंध करत असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झालेले नाही.

screenshot-www.hsph.harvard.edu-2020.09.08-18_06_25.png

हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ / संग्रहित

अमेरिकेतील द नॅशनल अकॅडमिक्स सायन्स ऑफ सायन्स इंजिनिअरिंग मेडिसिनने हा दावा असत्य असल्याचे स्पष्ट केले आहे. 

screenshot-sites.nationalacademies.org-2020.09.08-18_20_05.png

संग्रहित

निष्कर्ष

लिंबाच्या रसाने कोरोना विषाणूची लागण होत नाही अथवा तो नष्ट होतो, याचा कोणताही पुरावा आढळला नसल्याचे जागतिक आरोग्य स्पष्ट केले आहे. रंगा व्यंकटेश्वर राव यांनी आपल्याला राष्ट्रपती पदक मिळाले नसल्याचे आणि आपण पाच लाखाचे बक्षीस जाहीर केलेले नाही. त्यामुळे पोस्टमधील दावा असत्य आहे.

Avatar

Title:लिंबाच्या रसाने कोरोना विषाणू नष्ट होत नाही; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False