तथ्य पडताळणी : ट्विकल खन्ना म्हणाली का, मोदींना संसार म्हणजे काय हेच माहित नाही?

False राजकीय

अक्षयने मोदींची मुलाखत घेतली, यावर ट्विकल खन्ना यांनी प्रतिक्रिया दिल्याची वृत्तपत्र कात्रणाची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर पसरत आहे. अक्षयने मोदींची मुलाखत घेतली, त्यात माझ्या संसारातील तणाव मोदींमुळे मिटतात असा विषय आला. परंतु मला मोदींना कळवायचे आहे की आमच्या संसारातील तणाव मिटवण्यासाठी आम्हाला आपल्या मदतीची आवश्यकता नाही. आपल्याला संसार म्हणजे काय हेच माहित नाही? आपण कधी कुटुंबाची जबाबदारी संभाळलीच नाही. आपण आम्हाला काय मदत करणार?  ट्विकल खन्ना, असे या पोस्टमध्ये म्हटले या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

अक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

अक्षयकुमार याने मोदींची मुलाखत घेतल्यानंतर त्यावर यावर ट्विकल खन्ना यांनी काय प्रतिक्रिया दिली हे पाहण्यासाठी आम्ही ट्विकल खन्ना यांच्या ट्विटर अकाऊंटला भेट दिली. त्यावेळी त्यांनी दिलेली खालील प्रतिक्रिया दिसून आली. वृत्तपत्र कात्रणाचा शोध घेतला असता असे कात्रण कुठेही आढळून आले नाही.

अक्षयकुमार याने मोदींची मुलाखत घेतल्यानंतर त्यावर यावर ट्विकल खन्ना यांनी काय प्रतिक्रिया दिली हे पाहण्यासाठी आम्ही त्यांच्या फेसबुक अकाऊंटलाही भेट दिली. त्यावेळी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर आम्हाला त्यांची खालील प्रतिक्रिया दिसून आली.

अक्राईव्ह लिंक

ट्विकल यांनी याव्यतिरिक्तही माध्यमांना कुठे काय प्रतिक्रिया दिली का? हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी दैनिक लोकमतचे खालील वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तासाठीही ट्विकल यांच्या ट्विटर अकाऊंटचा संदर्भ वापरण्यात आला आहे.

अक्राईव्ह लिंक

दैनिक लोकसत्तानेही याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तातही ट्विकल यांच्या ट्विटर अकाऊंटचा संदर्भ देण्यात आला आहे.

अक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

वृत्तपत्राचे हे कात्रण आम्हाला कुठेही आढळून आले नाही. पोस्टमध्ये दावा करण्यात आल्याप्रमाणे ट्विकल खन्ना यांनी कुठेही प्रतिक्रिया दिल्याचे आढळून येत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.  

Avatar

Title:तथ्य पडताळणी : ट्विकल खन्ना म्हणाली का, मोदींना संसार म्हणजे काय हेच माहित नाही?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False