चेन्नईतील स्केटिंगचा जुना व्हिडिओ मुंबईतील मुलाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

False सामाजिक

मुंबईत चहा विकणारा जमाल मलिक अवघ्या सहा, सात वर्षाचा असून आज त्याने जे केले ते अगदी डोळ्याचे पारणे फेडणारे होते. असा जबरदस्त आणि खतरनाक स्टंट तुम्ही कधीच पाहिला नसेल. त्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, अशा माहितीसह समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मुंबईतीलच जमाल मलिक नावाच्या मुलाचा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

मुंबईत चहा विकणाऱ्या जमाल मलिक या अवघ्या सहा वर्षाच्या लहान मुलाचा हा व्हिडिओ आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी युटुयुबवर मुथुराज सुंदरम दिनांक 4 मे 2014 रोजी अपलोड केलेला एक व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओखाली देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, एस.इसाक हेनरी रुफसन या इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या आठवीत वर्षाच्या मुलाने चेन्नईतील थंजलम येथील सविधा अभियांत्रिकी महाविद्यालयात लिंबो स्केटिंगद्वारे 25 डस्टर कारखालून 100 मीटर अंतर कापण्याचा नवा विक्रम केला.

संग्रहित

त्यानंतर चेन्नईतील अरूलदास फोटो स्टुडिओचे कलई सेल्वान यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी हे चित्रीकरण काही वर्षापुर्वी चेन्नईतील सविधा अभियांत्रिकी महाविद्यालयात झाल्याचे सांगितले. ही घटना मुंबईतील नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर या विक्रमाची नोंद इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये असल्याचेही दिसून आले. 

निष्कर्ष

मुंबईत चहा विकणाऱ्या जमाल मलिक नावाच्या मुलाचा हा व्हिडिओ असल्याचा दावा असत्य आहे. तो चेन्नईत एस.इसाक हेनरी रुफसन या मुलाने 2014 मध्ये केलेल्या विक्रमाचा व्हिडिओ आहे. 

Avatar

Title:चेन्नईतील स्केटिंगचा जुना व्हिडिओ मुंबईतील मुलाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False