उजनी धरणातील लाटांचा 2018 मधील व्हिडिओ मांजरा धरणाच्या नावाने व्हायरल

False सामाजिक

महाराष्ट्रासह देशामध्ये मुसळधार पाऊस होत आहे. मराठवाड्यात अनेक शहरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, धरणे पूर्ण क्षमतेसह भरली आहेत. सोशल मीडियावर सध्या पुलावर उसळणाऱ्या लाटा धडकणारा व्हिडिओ शेयर करून दावा केला जात आहे की, मांजरा धरणाजवळील पूलाचा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला. हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा सोलापूरातील उजनी धरणाचा आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये

व्हायरल व्हिडिओत एका पुलाच्या दोन्ही बाजूने लाटा उसळा

एक रस्ता दिसतो ज्याच्या दोन्ही बाजूला पाणी आहे. काही लोक थांबून पाण्यात उसळून येत असलेल्या लाटा बघत आहे. यात दावा केला जात आहे की, व्हिडिओ मांजरा धरणाजवळील पूलाचा आहे. 

Facebook | Archive 

तथ्या पडताळणी

सर्वप्रथम व्हिडिओतील की-फ्रेमस निवडूण गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. तेव्हा झी 24 तास वृत्तवहिनीच्या युट्यूबवर सदरील व्हायरल व्हिडिओ मिळाला. त्यातील माहितीनुसार, हा व्हिडिओ सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाचा आहे. 2018 मध्ये समुद्रात भरतीच्या जशा लाटा उसळतात तशा उजनी धरणात मोठ्या लाटा उसळल्या होत्या.

 ABP माझाच्या 1 ऑक्टोबर 2018 रोजीच्या बातमीनुसार, इंदापूर तालुक्यातील भिगवण – खानोटा रस्त्यावर जुन्या ब्रिटिशकालीन पुलाजवळ या लाटा उसळत होत्या. दोन वर्षांपूर्वी पाणलोट भागात भरपूर पाऊस झाल्याने उजनीचे धरण पूर्ण भरले होते. हवेचा दाब निर्माण झाल्याने काठोकाठ भरलेल्या धरणात समुद्रासारख्या लाटा निर्माण झाल्या. प्रवाह वेगवान असल्याने रस्त्यावर पाणी उसळून येत होते. 

निष्कर्ष 

यावरून स्पष्ट होते की, लाटा उसळण्याचा तो व्हायरल व्हिडिओ एक तर दोन वर्षांपूर्वीचा आणि सोलापूर जिल्हातील उजनी धरणावरील आहे. तो बीड जिल्ह्यातील मांजरा धरणावरील नाही. 

Avatar

Title:उजनी धरणातील लाटांचा 2018 मधील व्हिडिओ मांजरा धरणाच्या नावाने व्हायरल

Fact Check By: Milina Patil 

Result: False