अबू आझमी यांच्यासमोर पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावण्यात आले नाही. पाहा सत्य…

Coronavirus False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्यासमोर समर्थकांनी “पाकिस्तान जिंदबाद” असे नारे लावले, अशा दाव्यासह एक व्हिडियो व्हायरल होऊ लागला आहे. अबू आझमी यांनी मुंबईतील वडाळा स्थानकावर श्रमिक रेल्वेतील प्रवाशांना भेट दिली असता त्यांनी मदत केलेल्या समर्थकांनी पाकिस्तानच्या नावाने घोषणा दिल्या, असे म्हटले जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने व्हिडियोची पडताळणी केली असता हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले.

काय आहे पोस्टमध्ये?

15 सेकंदाच्या व्हिडियोमध्ये अबू आझमी त्यांच्या समर्थकांसोबत रेल्वे फ्लॅटफॉर्मवरून जाताना दिसतात. तेव्हा काही प्रवासी घोषणा देतात. आधी अबू आझमी आणि नंतर मुंबई पोलिस जिंदाबादचे नारे ऐकू येतात. त्यानंतर त्यांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावले, असा दावा करण्यात आला आहे. 

मूळ पोस्ट येते पाहा  – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडियो मूलतः टिकटॉकवरून घेतलेला आहे. जबिर खान (@jabirkhan406) नामक युजरने 15 मे रोजी हा व्हिडियो शेयर केला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता. 

@jabirkhan406

♬ original sound – jabirkhan406

मूळ व्हिडियो येथे पाहा – टिकटॉक

हा व्हिडियो बारकाईने ऐकला तर लक्षात येते की, अबू आझमी आणि मुंबई पोलिसांनातर “साजिद भाई जिंदाबाद” असे म्हटले आहे. ते पाकिस्तान जिंदाबाद म्हणत नाहीत. हे साजिद भाई कोण याची माहिती घेण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने अबू आझमी यांच्या कार्यलयाशी संपर्क साधला. 

कोण आहे साजिद भाई?

साजिद सिद्दिकी हे समाजवादी पक्षाचे मुंबईतील दक्षिण-मध्य जिल्हाध्यक्ष आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “14 मे रोजी अबू आझमी यांच्यासोबत मी श्रमिक रेल्वेने जाणाऱ्या मजुरांना भेटण्यासाठी गेलो होतो. सदरील व्हिडियो छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील आहे. उत्तरप्रदेशमधील बांदा येथे ही ट्रेन सोडण्यात आली होती. या मजुरांना मोफत घरी जाण्याची आम्ही सोय केली होती. त्यामुळे त्यांनी धन्यवाद व्यक्त करीत अबू आझमी आणि माझ्या नावाने घोषणा दिल्या.”

sajid.jpg

पाकिस्तना जिंदबाद म्हटलेच नाही

साजिद सिद्दिकी म्हणाले की, “सदरील व्हिडियो ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हटलेलेच नाही. लोक चुकीचा दावा करीत आहेत. त्यावेळी स्थानकावर पोलिसदेखील उपस्थित होते. जर ‘पाकिस्तान जिंदाबाद’चा नारा दिला असता तर नक्कीच कारवाई झाली असती. समाजात तेढ निर्माण करण्यासाठी काही लोक खोट्या पोस्ट पसरवित आहेत. ही वेळ सर्वांनी एकत्र येण्याची असून मानवतेच्यदृष्टीने मदत करण्याची आहे. त्यामुळे लोकांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये.”

वरील व्हायरल व्हिडियोची दुसरी बाजू दाखवणारा व्हिडियो सिद्दीकी यांनी फॅक्ट क्रेसेंडोला पाठविला. तो तुम्ही खाली पाहू शकता. यामध्ये स्पष्ट ऐकू येते की, हे लोक “साजिद भाई जिंदाबाद” असे म्हणत आहेत. 

अबू आझमी यांच्यासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे दिल्याचा दावा व्हायरल होऊन लागल्यानंतर आझमी यांनी ट्विटरवर यासंबंधी व्हिडियोद्वारे खुलासा केला आहे. यामध्ये त्यांनी सदरील दावे खोटे असल्याचे सांगत समाजामध्ये दुफळी निर्माण करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे त्यांनी मुंबई पोलिसांना आवाहन केले.

अर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, अबू आझमी यांच्या समर्थकांनी “पाकिस्तान जिंदाबाद” अशा घोषणा दिल्या नाहीत. व्हिडियोमध्ये परप्रांतीय मजूर “साजिद भाई जिंदाबाद” असे म्हणत आहेत.

Avatar

Title:अबू आझमी यांच्यासमोर पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावण्यात आले नाही. पाहा सत्य…

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •