मोदींनी खरंच मुस्लिम टोपी घालून मशिदीला भेट दिली का? जाणून घ्या सत्य

False राजकीय
 • 1
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  1
  Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2011 साली अहमदाबाद येथे आयोजित ‘सद्भावना उपवास’ कार्यक्रमात नमाज टोपी (Skull Cap) घालण्यास नकार दिला होता. त्यावेळी यावरून खूप वाद निर्माण झाला होता. आता 2019 लोकसभा निवडणुकांचा ज्वर चढलेला असताना नरेंद्र मोदींचा मुस्लिम टोपी (Islamic Cap) घातलेला एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

मोदींमध्ये झालेला हा बदल अधोरेखित करून अनेकांनी त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. व्हायरल फोटोमध्ये दावा करण्यात येतोय की, मुस्लिम समाजाची मते मिळवण्यासाठी मोदी थेट टोपी घालून मशिदीमध्ये गेले आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

मोदींचा मशिदीमधील फोटो शेयर करून पोस्टमध्ये लिहिले की, अच्छे दिनच्या नावावर, विकासाच्या नावावर, रोजगाराच्या नावावर, काळ्या धनाच्या नावावर, राममंदिरच्या नावावर, लोकांना फसवून, हिंदूंच्या भावना दुखावल्या, पुलवामाचे नाटक करून 42 जवानांच्या नावावर मते मागण्याचे महापाप केले. हिंदूंचा विश्वासघात केला, ते आता मला मतदान करणार नाहीत. म्हणून शरण आलो.

तथ्य पडताळणी

पोस्टमधील फोटो गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर इंडिया टुडेने 2 जून 2018 रोजी प्रसिद्ध केलेल्या एका बातमीत खालील फोटो आढळला. या बातमीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन देशांच्या दौऱ्यादरम्यान सिंगापूर येथे भेट दिली होती. तीन दिवसीय दौऱ्यामध्ये त्यांनी सिंगापूरमधील विविध धार्मिक स्थळांना भेट दिली होती. यामध्ये नॅशनल ऑर्किड गार्डन, श्री मरियम्मन मंदिर, बौद्ध टुथ रेलिक मंदिर यांचा समावेश होता.

मूळ बातमी येथे वाचा – इंडिया टुडेअर्काइव्ह

भेटीच्या तिसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी तेथील सांस्कृतिक मंत्री ग्रेस यिन यांच्यासोबत चुलिया मशिदीमध्ये (Chulia Mosque) गेले होते. वर दिलेला फोटो या मशिदीतील आहे. सिंगापुरच्या चायनाटाऊन जिल्ह्यातील साऊथ ब्रिज रोड येथे चुलिया मशिद आहे. भारताच्या कोरोमंडल किनारपट्टीवरील तमिळ मुस्लिम व्यापाऱ्यांनी 1826 साली ही मशीद बांधली होती.

वरील फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, नरेंद्र मोदी यांनी कोणतीही टोपी घातलेली नाही. भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रविश कुमार यांनी मोदींचा चुलिया मशिदीमधील मूळ फोटो ट्विट केला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता.

अर्काइव्ह

या भेटीचा एएनआय या वृत्तसंस्थेने व्हिडियो यूट्यूबवर अपलोड केलेला आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता. यामध्येदेखील मोदींनी टोपी घातलेली नाही, हे स्पष्ट दिसते.

आता व्हायरल फोटो आणि मूळ फोटो यांची तुलना करून पाहू. यावरून स्पष्ट होते की, मोदींच्या डोक्यावर फोटोशॉप करून ही टोपी दावखवण्यात आली आहे.

संदर्भासाठी मुस्लिम टोपीचा एक नमुना खाली दिला आहे.

निष्कर्ष

नरेंद्र मोदींनी जून, 2018 मध्ये सिंगापूर येथील चुलिया मशीदीला दिलेल्या भेटीच्या फोटोला एडिट (छेडछाड) करून त्यांच्या डोक्यावर मुस्लिम टोपी दाखवण्यात आली आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य ठरते. या जुन्या फोटोवरून मोदी मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी मशिदीला भेट देत असल्याचा दावा केला जात आहे.

Avatar

Title:मोदींनी खरंच मुस्लिम टोपी घालून मशिदीला भेट दिली का? जाणून घ्या सत्य

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False


 • 1
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  1
  Share