सत्य पडताळणी : राहुल गांधींवर स्नायपरनं 7 वेळा गोळ्या झाडण्याचा प्रयत्न

राजकीय
 • 1
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  1
  Share

(छायाचित्र सौजन्य : khaleejtimes )

‘राहुल गांधीच्या जीवाला धोका; स्नायपरनं 7 वेळा गोळ्या झाडण्याचा प्रयत्न’ झाल्याची एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. याबाबतचे पत्र काँग्रेसने राजनाथ सिंह यांना लिहिले आहे, असेही या पोस्टमध्ये म्हटलेले आहे. फॅक्ट क्रेसेडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

राहुल गांधी यांच्यावर खरंच हल्ला झाला असं पत्र खरंच काँग्रेसने दिलं का? हे जाणून घेण्याचा आम्ही सगळ्यात पहिल्यादा प्रयत्न केला. काँग्रेसच्या वतीने याबाबत पत्रकार परिषद घेत असा कोणताही हल्ला झाला नसल्याचे म्हटले आहे. काँग्रेसने याबाबत पत्रही लिहिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 27 मिनिट 34 सेकंद ते 30 मिनिट 39 सेंकदपर्यंत तुम्ही त्यांचे म्हणणे ऐकू व पाहू शकता.

अखिल भारतीय काँग्रेस कमेटीने याबाबत काढलेल्या प्रसिध्दी पत्रकातही याचा उल्लेख आहे तो तुम्ही खाली पाहू शकता.

केंद्रीय गृहमंत्रालयानेही याबाबत खुलासा केल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. हे ट्विट तुम्ही खाली पाहू शकता.

आक्राईव्ह लिंक

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजे SPG ने याबाबत माहिती दिल्याचे ट्विटही एएनआयने दिले आहे. तेही आपण खाली पाहू शकता.

आक्राईव्ह लिंक

याबाबत आम्ही काँग्रेसच्या वरिष्ठ प्रवक्त्यांशी संपर्क साधला असता त्यांनी काँग्रेस इंडियन नॅशनल काँग्रेस अशा प्रकारचे पत्र वापरत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खाली पाठविण्यात आलेल्या बनावट पत्रातील मार्क केलेला भाग पाहा

काँग्रेस केवळ अखिल भारतीय काँग्रेस कमेटीच्या नावाने असलेले लेटरहेड वापरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आपण ते मार्क केलेले खाली पाहू शकता.

निष्कर्ष

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर कोणताही स्नायपर हल्ला झालेला नाही. काँग्रेसनेही याबाबत कोणतेही पत्र गृह मंत्रालयाला पाठविण्यात आलेले नाही. त्यामुळे व्हायरल होत असलेली ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : राहुल गांधींवर स्नायपरनं 7 वेळा गोळ्या झाडण्याचा प्रयत्न

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False


 • 1
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  1
  Share