अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंना ट्विटरवर लाचार म्हटले का? वाचा सत्य

False राजकीय | Political

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन करत कौतुक केले होते. यानंतर सोशल मीडियावर दावा करण्यात येऊ लागला की, अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छा नाकारत त्यांना ‘लाचार’ म्हटले. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा ठरला.

काय आहे दावा?

केजरीवाल यांच्या कथित ट्विटचा स्क्रीनशॉट शेयर केले जात आहे. यामध्ये म्हटले की, शिवसेनेच्या प्रशंसेची आम्हाला गरज नाही. काँग्रेससोबत जाणारे ते लाचार आहेत. ते कधीही भाजपसोबत जाऊ शकतात. आम्ही एकटे लढलो आहोत आणि पुढेही एकटे लढणार

केजरीवाल यांनी खरोखरच असे ट्विट केले आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

screenshot-www.facebook.com-2020.02.12-11_43_29.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अधिकृत ट्विटर खात्यास भेट दिली. त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे आभार मानत केजरीवाल यांनी केलेले खालील ट्विट आम्हाला दिसून आले. 

Archive

त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत ट्विटर खात्यास भेट दिली. याठिकाणी उद्धव ठाकरे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल अरविंद केजरीवाल यांना उद्देशून दोन ट्विट केल्याचे दिसून आले. या ट्विटला उत्तर देताना अरविंद केजरीवाल यांनी कुठेही अशा प्रकारचे ट्विट केल्याचे आम्हाला दिसून आले नाही. 

Archive

यातून स्पष्ट होत आहे की, अरविंद केजरीवाल यांनी असे कोणतेही ट्विट केलेले नाही. केजरीवाल यांनी केलेल खरे ट्विट आणि सोशल मीडियावरील खोटे ट्विट यांची तुलना खाली केली आहे. यामध्ये स्पष्ट दिसते की, उद्धव ठाकरे यांचे ट्विटर हँडल @OfficeofUT असे आहे. खोट्या ट्विटमध्ये ते @uddhavthackeray दिले आहे. याचा अर्थ की, हे ट्विट बनावट आहे.

2020-02-12.jpg

निष्कर्ष

केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांना लाचार म्हटल्याचे ट्विट बनावट आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला घवघवीत यश मिळाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. त्याबद्दल केजरीवाल यांनी त्यांचे आभार मानले आहेत. 

Avatar

Title:अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंना ट्विटरवर लाचार म्हटले का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False