सत्य पडताळणी : राज ठाकरेंच्या व्हिडिओतील हा युवक केवळ 8 दिवसातच बेरोजगार झाला?

False राजकीय
 • 15
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  15
  Shares

हरिसाल डिजिटल गावातील तरुण राज ठाकरेंच्या व्हिडिओनुसारच 8 दिवसापुर्वी मॉडेल दुकानदार होता आणि 8 दिवसांनी बेरोजगार झाला, असा दावा सोशल मीडियावरुन करण्यात येत होता. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

आक्राईव्ह लिंक   

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम आम्ही युटूयूबवर हरिसाल डिजिटल गावाची जाहिरात शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला खाली दिलेली जाहिरात दिसून आली. या व्हिडिओत संबंधित युवक दिसत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात सर्वप्रथम याचा उल्लेख केला होता. हरिसाल गावातील नेमकी स्थिती काय आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न या व्हिडिओत केल्याचा दावा राज ठाकरेंनी केला होता. खालील लिंकवर आपण हा व्हिडिओ पाहू शकता.

राज ठाकरेंनी उल्लेख केल्यानंतर हा युवक चर्चेत आला होता. दैनिक लोकसत्ताने हा युवक सध्या काय करतो, याबाबतचे वृत्त दिले होते. या वृत्तात गेल्या सहा ते सात महिन्यापासून त्याचे दुकान बंद असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. तो सध्या पुण्यात वास्तव्यास असल्याचेही त्याने स्वत: सांगितले आहे. हरिसालमधील काही ग्रामस्थांनी मनोहर तालुक्यातच असल्याचे सांगितले. तर काही ग्रामस्थांनी मात्र, मनोहर पुण्यात असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला, असेही लोकसत्ताने म्हटले आहे. मनोहर हा मुद्रा योजनेचा लाभार्थी असल्याचे गावच्या सरपंचांचे म्हणणे आहे.

आक्राईव्ह लिंक

टीव्ही 9 मराठीनेही हरिसाल गावात जात तेथील परिस्थितीची पाहणी केली. या ठिकाणी मनोहर रोजगारासाठी पुण्यात गेला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्याचे दुकान चार ते पाच महिन्यापासून बंद असल्याचेही ग्रामस्थांनी टीव्ही 9 मराठीला सांगितले. संदीप देशपांडे यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून तो तुम्ही खाली पाहू शकता. त्यानंतर राज ठाकरेंनी या युवकाला सोलापूरमधील सभेत थेट लोकांसमोर आणल्याचे तुम्हाला दिसून येईल. पुण्या-मुंबईत हा युवक रोजगार शोधत असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले.

निष्कर्ष

मनोहर खडके हा युवक मागील अनेक महिन्यांपासून बेरोजगार असल्याचे हरिसाल ग्रामस्थांचे म्हणणे आहे. टीव्ही 9 आणि लोकसत्ताच्या वृत्तातून ही बाब स्पष्ट होते. तो सध्या रोजगाराच्या शोधात आहे. त्यामुळे पोस्टमध्ये करण्यात येत असलेला तो 8 दिवसात बेरोजगार झाला, हा दावा असत्य आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : राज ठाकरेंच्या व्हिडिओतील हा युवक केवळ 8 दिवसातच बेरोजगार झाला?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False


 • 15
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  15
  Shares