हा व्हिडिओ, ही घटना आळंदीतील आहे का?

False सामाजिक

इंद्रायणी नदीला प्रचंड पूर पंधरा वर्षानंतर आळंदी माऊली मंदिरात पाणी शिरले आहे, असा दावा करत Dattatray Gore यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी 

आळंदीत पाऊस पडत आहे का? इंद्रायणी नदीला पूर आला आहे का? याची शोध घेण्याचा आम्ही सर्वप्रथम प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला खालील परिणाम दिसून आला. 

या परिणामात आम्हाला याबाबतचा अपेक्षित व्हिडिओ न दिसल्याने आम्ही आमचा तपास पुढे नेला. आम्ही या व्हिडिओतील काही दृश्ये घेत ती रिव्हर्स इमेज सर्च केली. त्यावेळी आम्हाला खालील परिणाम मिळाला. 

या परिणामात दावा करण्यात आला होता की, अजमेर येथील दर्ग्याजवळ बुडत असलेला व्यक्ती. त्यामुळे आम्ही याबाबत काही माहिती मिळते का, हे शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी खालील वृत्त दिसून आले. द टाईम्स ऑफ इंडियाने 2 ऑगस्ट 2019 रोजी एएनआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. या वृत्तात याबाबतच्या व्हिडिओचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.

द टाईम्स ऑफ इंडिया / Archive 

न्यूज 18 ने यूटूयूबवर या घटनेचे व्हिडिओ दिला आहे. राजस्थानमधील अजमेरमध्ये पुराच्या पाण्यात एक व्यक्ती वाहून गेल्याचे या व्हिडिओत म्हटले आहे. 

इंडिया टूडेने एक ऑगस्ट 2019 या घटनेचे वृत्त दिले आहे. या वृत्तात राजस्थानमधील अजमेर येथे पुरामुळे एक व्यक्ती वाहून जात असताना त्याला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओतील काही दृश्येही इंडिया टूडेने प्रसिध्द केली आहेत.

इंडिया टूडे / Archive

एएनआय या वृत्तसंस्थेने या घटनेचा आपल्या ट्विटर खात्यावर दिलेला व्हिडिओ आपण खाली पाहू शकता. 

पुण्याच्या उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांच्याशी आम्ही संपर्क केला असता त्यांनी आळंदीत अशी घटना घडली नसल्याचे स्पष्ट केले. 

निष्कर्ष

आळंदीतील माऊली मंदिरात पाणी शिरल्याचा म्हणून दर्शविण्यात येणारा हा व्हिडिओ राजस्थानमधील अजमेर येथील आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:हा व्हिडिओ, ही घटना आळंदीतील आहे का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False