पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांच्या वडिलांच्या हत्येबाबत एफआयआर दाखल आहे का?

False राजकीय

(संग्रहित छायाचित्र) सौजन्य – इंडिया टुडे

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वडिलांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवत त्यांच्या बहिण-भावांनी त्यांच्यावर एफआयआर दाखल केला, असे म्हटले आहे. या पोस्टमध्ये नरेंद्र मोदींचा किशोर वयातील फोटो देखील दिलेला आहे.

फेसबुक अर्काईव्ह

सत्य पडताळणी

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये ऐसा कोई सगा नही जिसे मोदीने ठगा नही असे ठळक अक्षरात लिहिले असून, त्या खाली आज भी नरेंद्र मोदी के भाई बहन नरेंद्र मोदी को ही अपने पिताजी के मौत के जिम्मेदार मानते है असे लिहिले आहे. तसेच या पोस्टमध्ये किशोरवयीन नरेंद्र मोदी यांचा फोटो आणि बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पोस्ट संदर्भात गुगलवर नरेंद्र मोदी यांच्या वडिलांचा मृत्यू कसा झाला हे सर्वप्रथम शोधले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्याबद्दल माहिती शोधली.

कसे होते नरेंद्र मोदींचे आणि त्यांच्या वडिलांचे संबंध?

नरेंद्र मोदी आणि त्यांच्या वडिलांचे संबंध अत्यंत साधे होते. लहानपणी नरेंद्र त्यांचे वडिल दामोदर यांना चहा विकण्यासाठी शाळा सुटल्यावर मदत करत असे. व्हायरल पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, नरेंद्र मोदी यांचे बहिण भाऊ आजही दामोदर (त्यांचे वडिल) यांच्या मृत्यूसाठी नरेंद्र मोदींना जबाबदार मानतात. त्यामुळे आम्ही नरेंद्र मोदी यांचे बहिण भाऊ आज काय करतात, कुठे असतात, कसे जगतात हे जाणण्याचा प्रयत्न केला.

नरेंद्र मोदी यांचे बहिण भाऊ सध्या काय करतात?

दैनिक भास्करअर्काईव्ह

व्हायरल पोस्टमध्ये नरेंद्र यांच्या वडिलांच्या मृत्यूबद्दल त्यांनी रेल्वे स्टेशनवर चहा विकताना कोणाचेतरी पाकिट पडले असताना 300 रुपये घेतले, तेव्हा रेल्वे पोलिसांनी त्यांना पकडल्यानंतर त्यांना 6 महिन्याची शिक्षा झाली असे म्हटले आहे. याशिवाय नरेंद्र मोदी यांच्या वडिलांनी रेल्वेस्टेशनवर असणारे लोखंड, कोळसा आणि पाकिटमार करुन त्या पैशांचे सोने खरेदी केले असे म्हटले आहे. तसेच ते सोने नरेंद्र मोदी घेवून घरातून पळून गेले असा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. आणि हे जेव्हा नरेंद्र यांच्या वडिल दामोदर यांना कळाले तेव्हा त्यांना हार्ट अटॅक आला, त्यात त्यांचा मृत्यू झाला असे लिहिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी घरातून निघून का गेले?

नरेंद्र मोदी यांनी वयाच्या 08 व्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम केले आहे. नरेंद्र यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 यावर्षी झाला. तर वयाच्या 8 व्या वर्षी त्यांनी गुजरातमधील पहिले प्रांत प्रचारक लक्षमराव इनामदार उर्फ वकील साहेब यांनी नरेंद्र यांना बालस्वयंसेवक म्हणून शपथ दिली. त्या आधारे नरेंद्र मोदी हे घरातील दागिने चोरुन, निघून गेले हा पोस्टमधील दावा खोटा ठरतो.

वेब दुनियाअर्काईव्ह

नरेंद्र मोदी हे वयाच्या 18 व्या वर्षी हिमालयात सन्यस्त वृत्तीने फिरण्यासाठी निघून गेले. 1995 -1996 या काळात ते गिरच्या जंगलात एकटे राहत असत.

इंडिया टुडेअर्काईव्ह

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वडिलांच्या मृत्यू कसा झाला?

अत्यंत गरिबी असल्यामुळे नरेंद्र यांचे वडिल अनेक प्रयत्नांनी, कष्टाने आपल्या परिवाराचा सांभाळ करत असे. मोदींच्या वडिलांचा मृत्यू हार्ट अटॅक मुळे झाला, तसेच (गरिबीमुळे) त्या अवस्थेत त्यांचा उपचार नीट होऊ न शकल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या वेळी नरेंद्र त्यांच्या वडिलांच्या जवळ नव्हते याचे आजही नरेंद्र यांना वाईट वाटते.

डेली हंटअर्काईव्ह समाचार नामाअर्काईव्ह

नरेंद्र मोदींवर 1996 या वर्षी एफआयआर गुन्हा दाखल झाला आहे का?

याआधी उल्लेख केल्याप्रमाणे नरेंद्र मोदी हे वयाच्या 18 व्या वर्षी हिमालयात सन्यस्त वृत्तीने फिरण्यासाठी निघून गेले. 1995 -1996 या काळात ते गिरच्या जंगलात एकटे राहत असत. त्यामुळे नरेंद्र यांच्यावर त्या काळात एफआयआर गुन्हा दाखल झालेला नाही. परंतू नंतरच्या राजकीय कार्यकाळात नरेंद्र मोदींवर एफआयआर गुन्हे दाखल झालेले आढळून आले. खाली दिलेल्या लिंकवर आपण नरेंद्र मोदी यांच्यावर दाखल एफआयआर पाहू शकता.

सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या पोस्टमध्ये देण्यात आलेला नरेंद्र मोदींच्या बातमीचा फोटो आणि मुळ नरेंद्र मोदींवर लिहिण्यात आलेला लेख हे दोन्हीही वेगवेगळे आहेत. मुळ लेख हा केवल सच या 2017 च्या मासिकातील असून, या लेखातील मजकूर एडिट करुन, या लेखातील फोटो वापरुन सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे.

केवल सचअर्काईव्ह

निष्कर्ष : संपुर्ण संशोधनानंतर असे आढळून आले की, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वडिलांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवत त्यांच्या बहिण-भावांनी त्यांच्यावर एफआयआर दाखल केला संपुर्ण मजकूर हा असत्य आहे.

Avatar

Title:पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांच्या वडिलांच्या हत्येबाबत एफआयआर दाखल आहे का?

Fact Check By: Amruta Kale 

Result: False