तथ्य पडताळणी : शीला दीक्षित म्हणाल्या का, मनमोहन सिंग यांच्यापेक्षा मोदी हे अधिक शक्तीशाली नेते?

Mixture राजकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

मनमोहन सिंग यांच्यापेक्षा मोदी हे अधिक शक्तीशाली नेते आहेत, असे वक्तव्य दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनी केल्याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

शीला दीक्षित यांनी मनमोहन सिंग यांच्यापेक्षा मोदी हे अधिक शक्तीशाली नेते आहेत, असे वक्तव्य केले आहे का? याचा आम्ही सर्वप्रथम शोध घेतला. त्यावेळी आम्हाला एनडीटीव्ही इंडिया या संकेतस्थळावर एक वृत्त दिसून आले. या वृत्ताच्या शीर्षकात शीला दीक्षित म्हणाल्या की, दहशतवादाविरोधात मनमोहन सिंग यांची भूमिका मोदींइतकी कडक नव्हती.

एएनआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने एनडीटीव्ही इंडियाने हे वृत्त दिले आहे.

अक्राईव्ह

या वृत्तावर आम्ही आमचा शोध पुढे नेत असतानाच आम्हाला शीला दीक्षित यांचे एक ट्विट दिसून आले. या ट्विटमध्ये त्यांनी आपले वक्तव्य चुकीच्या पध्दतीने मांडलं जात असल्याचं म्हटलं आहे.

पत्रकार वीर संघवी यांनी याला लगेच दुजोरा देत आपण त्यांना मुलाखतीत एक प्रश्न विचारला होता. त्याला त्या उत्तर देत होत्या. याच्या चुकीच्या पध्दतीने अर्थ घेऊ नका पूर्ण मुलाखत पाहा, असे म्हटले आहे.

शीला दीक्षित यांनी वीर संघवी यांना दिलेली ही पूर्ण मुलाखत पाहिली असता त्यांनी असे वक्तव्य केल्याचे दिसून येत आहे. राजकीय फायद्यासाठी ते असे करत असल्याची जनभावना असल्याचेही त्या म्हणाल्या. मोदी यांच्या जागी अन्य कोणी असते तर त्यांनीही हेच केले असते असे त्या या प्रश्नाआधी म्हणाल्या आहेत. 11 मिनिटे 41 सेकंद ते 12 मिनिटे 58 सेकंद या कालावधीत त्या नेमक्या काय म्हणाल्या हे तुम्ही ऐकू शकता.

निष्कर्ष

शीला दीक्षित यांनी वीर संघवी यांना दिलेल्या मुलाखतीत मनमोहन सिंग यांच्यापेक्षा मोदी हे अधिक शक्तीशाली नेते असल्याच्या मुलाखतकारांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. त्या मोदी हे राजकीय फायद्यासाठी एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक करत असल्याची जनभावना असल्याचेही म्हणाल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हटले आहे ते देखील असत्य आहे. त्या दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आहेत. या पोस्टमध्ये देण्यात आलेली माहिती ही संमिश्र स्वरुपाची म्हणजेच अर्थसत्य असल्याचे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत आढळून आले आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणी : शीला दीक्षित म्हणाल्या का, मनमोहन सिंग यांच्यापेक्षा मोदी हे अधिक शक्तीशाली नेते?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: Mixture


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •