शाहरुख खान टिपू सुलतानवर चित्रपट काढत नाहीए; ते पोस्टर फेक आहे. वाचा सत्य

Coronavirus False

सोशल मीडियावर अफवा उडाली आहे की, टिपू सुलतानच्या जीवनावर आधारित चित्रपटात शाहरुख खान प्रमुख भूमिकेत असणार आहे. सोबत या कथित चित्रपटाचे पोस्टरदेखील शेयर होत आहे. यावरून शाहरुखवर धार्मिक शेरेबाजी केली जात आहे. या पोस्टवरून हिंदु-मुस्लिम वादाला तोंड फुटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट खोटी आढळली असून, त्यावरून विनाकारण वातावरण तापले आहे.

काय आहे पोस्टमध्ये?

fbdssxss.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडातळणी

शाहरुख खानने झीरो (2018) चित्रपटाच्या अपयशानंतर एकाही चित्रपटात काम केलेले नाही. त्याचा आगामी चित्रपट कोणता असणार याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शाहरुख खान त्याच्या ट्विटरवरून नेहमीच नव्या चित्रपटाची घोषणा करतो. पंरतु, त्याने टिपू सुलताना चित्रपटात काम करणार असल्याचे एकही ट्विट केलेले नाही.

मग ही बातमी आली कुठून?

युट्यूबवर झैन खान नावाच्या एका युट्युब अकाउंटवर 2018 साली टिपू सुलतान चित्रपटाचे ‘फॅनमेड’ ट्रेलर अपलोड करण्यात आले होते. आतापर्यंत या ट्रेलरला 80 लाखांपेक्षा अधिक व्ह्युव्ज आहेत. ते तुम्ही खाली पाहू शकता.

या ट्रेलरच्या सुरुवातीलाच म्हटले आहे की, “सदरील ट्रेलर हे चाहत्याने तयार केलेले आहे. केवळ मनोरंजनाच्या हेतूने विविध चित्रपटातील दृश्ये घेऊन हे काल्पनिक ट्रेलर तयार करण्यात आले आहे.”

यावरून हा काही अधिकृत चित्रपट आणि ट्रेलरही नाही. चाहत्याने तयार केलेल्या अनाधिकृत पोस्टवरून चुकीच्या पोस्ट व्हायरल होत आहे.

disclaimer.png

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, एका चाहत्याने तयार केलेल्या ट्रेलरवरून शाहरुखविषयी चुकीच्या पोस्ट व्हायरल होत आहे. शाहरुख खानचा पुढील चित्रपट टिपू सुलतान नाही. हे बनावट पोस्टर आणि पोस्ट आहे.

(फॅक्ट क्रेसेंडो मराठी आता टेलीग्रामवरसुद्धा ! आमच्या चॅनेलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.) 

Avatar

Title:शाहरुख खान टिपू सुलतानवर चित्रपट काढत नाहीए; ते पोस्टर फेक आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False