सत्य पडताळणी : कॅन्सर, ह्दयविकारासारख्या 10 आजारापासून रम पिल्याने बचाव?

Mixture

रम पिण्याचे फायदे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण रम फक्त दारु नसून औषध आहे. रम पिल्याने माणसाला केवळ नशा होत नसून आरोग्यासही फायदा होतो, असा दावा insortmarathi.com या संकेतस्थळाने केला आहे.

आक्राईव्ह लिंक

सोशल मीडियावरही याबाबत विविध माहिती पसरविण्यात येत आहे.

https://www.facebook.com/hindutvainfomedia/posts/1510640629069337

आक्राईव्ह लिंक – फेसबुक

अपनी खबरे डॉट कॉम या हिंदी संकेतस्थळावरही अशाच स्वरुपाचा दावा करण्यात आला आहे. खाली देण्यात आलेल्या लिंकवर तुम्ही याबाबतचे वृत्त सविस्तर वाचू शकता.

Apnikhabare
आक्राईव्ह लिंक – अपनी खबरे

तथ्य पडताळणी

रम पिण्याचे शारीरिक फायदे असण्याबरोबरच नुकसान असल्याचेही आम्ही याबाबत न्यूरो थेरिपिस्ट डॉ. गोविंद आपटे यांनी विचारले असता त्यांनी सांगितले. औषध असो की दारु गरज असल्यासच ती काही प्रमाणात घेणे योग्य ठरते. या दोन्ही गोष्टी घेण्याची गरज आहे की नाही हे केवळ डॉक्टरच सांगू शकतात. रोज 100 मिलीलीटर रम आरोग्यास चांगली असते, हा पसरविण्यात येत असलेला गैरसमज आहे.

याशिवाय आम्ही खाली काही लिंक देत आहोत या रम अथवा दारु पिण्याचे फायदे आणि तोटे याविषयी माहिती देण्यात आली आहे.

Healthline
आक्राईव्ह लिंक – ड्रग फ्री वर्ल्ड
Drugfreeworld
आक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

डॉक्टरांनी सल्ला दिल्यासच रम योग्य प्रमाणात सेवन करणे आरोग्यास लाभदायक ठरु शकते. प्रत्येकाच्या शरीराची प्रतिकारशक्ती ही भिन्न असते. त्यामुळे रम पिणे आरोग्यासाठी चांगले आहे. रम पिल्याने आजार दूर होतात, असे सरसकट म्हणणे चूकीचे आणि अर्थसत्य असल्याचे फॅक्ट क्रिसेन्टोच्या तथ्य पडताळणीत आढळून आले आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : कॅन्सर, ह्दयविकारासारख्या 10 आजारापासून रम पिल्याने बचाव?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: Mixture