केजरीवाल यांच्या रॅलीत मोदींचा मुखवटा घालून प्रचार करणाऱ्या समर्थकाचा व्हिडिओ गुजरातचा नाही; वाचा सत्य

Partly False राजकीय | Political

गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून, सोशल मीडियावर भाजप आणि आम आदमी पार्टी (आप) कार्यकर्त्यांमध्ये चुरस रंगत आहे. 

याच पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांच्या रॅलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, गुजरातमध्ये अरविंद केजारीवाल यांच्या रॅलीत त्यांचे समर्थक नरेंद्र मोदींचा मुखवटा घालून प्रचार करीत आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

आमच्या तथ्य पडताळणीत हा दावा खोटा आढळला आहे. हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा असून तो दिल्लीतील आहे. 

काय आहे दावा ? 

व्हायरल व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदींचा मुखवटा घातलेला एक व्यक्ती केजरीवाल यांच्यासोबत चालताना दिसतो. कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “गुजरातमध्ये अरविंद केजरीवाल यांचा समर्थक”

ट्विटर

तथ्य पडताळणी

कीवर्ड सर्चद्वारे कळाले की, हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. न्युज-18 च्या बातमीनुसार हा व्हिडिओ 2020 साली झालेल्या दिल्ली विधानसभेच्या प्रचार रॅलीमधील आहे. 

अरविंद केजरीवाल यांच्यासोबत चालणाऱ्या एका तरुणाने अचानक मोदींचा मुखवटा घातला होता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप गाजला होता.

मूळ बातमी – न्यूज18

टिकटॉकर आकाश सागर याने हा व्हिडिओ तयार केला होता. मोदींचा मुखवटासुद्धा त्याने घातला होता. त्याने टिकटॉकवर हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर तो व्हायरल झाला होता. 

आकाशने त्याच्या युट्यूब चॅनेलवर 30 जानेवारी 2020 रोजी हा व्हिडिओ शेअर केला होता.

निष्कर्ष 

यावरुन सिद्ध होते की, हा व्हिडिओ गुजरातचा नसून दिल्लीचा आहे आणि दोन वर्षापूर्वीचा आहे. चुकीच्या दाव्यासह जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.        

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:केजरीवाल यांच्या रॅलीत मोदींचा मुखवटा घालून प्रचार करणाऱ्या समर्थकाचा व्हिडिओ गुजरातचा नाही; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Partly False