उत्तराखंडमध्ये मदतकार्य म्हणून 2013 सालातील जुना फोटो व्हायरल; वाचा सत्य

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

उत्तराखंडमध्ये गेल्या रविवारी (दि. 8) चमोली जिल्ह्यातील नंदादेवी हिमकड्याचा काही भाग कोसळून पूर आला. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला तर इतरांचा शोध घेतला जात आहे. अशातच सोशल मीडियावर बचावकार्याचा एक फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी पुरात वाहून गेलेल्या 13 गावांमध्ये असे बचावकार्यक कले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) शेअर करीत सत्यतेबाबत विचारणा केली. पडताळणीअंती कळाले की, हा फोटो 2013 मधील आहे.

काय आहे दावा?

डोंगरमाथ्यावरून पाठीवर पोते घेऊन जाणाऱ्या काही लोकांचा फोटो शेअर केले की, “उत्तराखंडमध्ये 13 गावे वाहून गेले; घरदार सर्व काही वाहून गेल होते. त्याच्यात पूल ,रस्ते पुराच्या पाण्याने वाहून गेले आहेत अश्याही कठीण परिस्थितीत स्वतःच्या खांद्यावरून खाद्य सामुग्री, चादर, चटई इतर गरजू वस्तूची मदत करताना RSS चे स्वयंसेवक.”

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हा फोटो नेमका कधीचा आहे हे शोधले. रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो गेल्या 8 वर्षांपासून हा फोटो उपलब्ध आहे.

‘संवाद’ नामक संस्थेच्या वेबसाईटवर 2013 साली हा फोटो आढळला. आठ वर्षांपूर्वी उत्तराखंडमध्येच आलेल्या पुराच्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी अशी मदत केली होती. 

मूळ वेबसाईट – संवाद 

म्हणजेच की, हा फोटो यंदाचा नाही. तो जुना आहे. 

यानंतर फॅक्ट केसेंडोने उत्तराखंड येथील जोशीमठ येथील उपविभागीय दंडाधिकारी कुमकुम जोशी यांच्याशी व्हायरल मेसेजबाबत विचारणा केली. त्यांनी सांगितले की, व्हायरल दावा असत्य असून, सर्व गावांशी संपर्क झालेला आहे. सर्व गावकऱ्यांना त्यांच्या त्यांच्या गावात परत पाठविण्यात आलेले आहे.

यानंतर आम्ही तपोवन गावाचे सरपंच किशोर कनियाल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, गाव किंवा गावकऱ्यांना काहीही नुकसान झालेले नाही. सोशल मीडियावर या दुर्घटनेविषयी संभ्रम पसरवू नये, असेही त्यांनी आवाहन केले. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, 2013 मधील जुन्या फोटोला चुकीच्या माहितीसह पसरविण्यात येत आहे. उत्तरखंडमधील 13 गावांशी संपर्क झालेला असून, कोणतेही नुकसान झालेले नाही.

Avatar

Title:उत्तराखंडमध्ये मदतकार्य म्हणून 2013 सालातील जुना फोटो व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •