पुण्यातील ससून रुग्णालयाचा म्हणून व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाटण्यातील; वाचा सत्य

False सामाजिक

महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण सध्या पुण्यात सापडत असतानाच शहरातील ससून रुग्णालयाचा म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातील व्हायरल होणारा हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी 

पुण्यातील ससून रुग्णालयाचा हा व्हिडिओ आहे का, हे जाणून घेण्यासाठी यातील एक द्दश्य घेऊन ते रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी मिळालेल्या परिणामात त्यावेळी द फ्री प्रेस जर्नलच्या संकेतस्थळाने 19 जुलै 2020 रोजी देण्यात आलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार कोविड-19 रूग्णालयातील व्हिडिओ म्हणून असत्य माहिती पसरविल्याप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा तोच व्हिडिओ आहे जो पुण्यातील ससून रुग्णालयातील म्हणून व्हायरल होत आहे, असे दिसून आले.

screenshot-www.freepressjournal.in-2020.07.22-16_39_26.png

द फ्री प्रेस जर्नलचे वृत्त / संग्रहित

बंगळूरूचे सहपोलीस आयुक्त संदीप पाटील यांनीही हा व्हिडिओ तेथील कोविड रुग्णालयाचा नसल्याचे स्पष्ट केल्याचे ट्विट आपण खाली पाहू शकता.

संग्रहित

बंगळूरूचे पोलीस आयुक्त भास्कर राव यांनीही ट्विट करत हा व्हिडिओ तेथील नसल्याचे स्पष्ट केल्याचे आपण पाहू शकता.

संग्रहित

इंडिया टीव्हीने 18 जुलै 2020 रोजी दिलेल्या वृत्तात बिहारमधील पाटण्यातील महावीर रिसर्च सेंटरमध्ये बाह्य रूग्ण विभागात झालेली ही गर्दी असल्याचे म्हटले आहे. यामुळे डॉक्टर, नर्स आणि रुग्णांना धोका निर्माण झाल्याचे म्हटले आहे.

संग्रहित

त्यानंतर बिहार यूथ (संग्रहित) या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओखाली डॉ. राणा सिंह यांनी केलेल्या टिप्पणीत हा व्हिडिओ पाटण्यातील महावीर कॅन्सर रिसर्च सेंटरमधील असल्याचे आपण स्वत: त्याचे चित्रीकरण केले असल्याचे म्हटले आहे. डॉ. राणा सिंह हे महावीर कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये कार्यरत असल्याचे आपण येथे (संग्रहित) पाहू शकता. त्यानंतर महावीर कॅन्सर रिसर्च सेंटरच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि माजी आयपीएस अधिकारी यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर असलेली त्यांनी याबाबत केलेला खुलासा दिसून आला. तो आपण खाली पाहू शकता.

संग्रहित

यातून हे स्पष्ट झाले की, हा व्हिडिओ पुण्यातील ससून रूग्णालयातील नसून पाटण्यातील महावीर कॅन्सर रिसर्च सेंटरमधील आहे.

निष्कर्ष

पुण्यातील ससून रूग्णालयाचा हा व्हिडिओ असल्याचा दावा असत्य आहे. पाटण्यातील महावीर कॅन्सर रिसर्च सेंटरचा हा व्हिडिओ आहे.

Avatar

Title:पुण्यातील ससून रुग्णालयाचा म्हणून व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाटण्यातील; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False