सत्य पडताळणी : काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या?

False राजकीय
 • 6
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  6
  Shares

पवार साहेब मुख्यमंत्री असताना केंद्रात राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असताना 2004 ते 2014 या कालावधीत एक लाख 74 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची पोस्ट भाजपा लोकसभा महाराष्ट्र राज्य या पेजवरुन शेअऱ होत आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

देशभरात आणि महाराष्ट्रात किती जणांनी आत्महत्या केल्या याची पडताळणी करण्यासाठी आम्ही राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या संकेतस्थळास भेट दिली. 2004 पासूनच्या आत्महत्यांच्या नोंदी तपासण्यास आम्ही सुरुवात केली. त्यावेळी आम्हाला शेतकरी आत्महत्या अशी सर्वत्र वर्गवारी आढळली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या Self-employed (Others) आणि Others या वर्गवारीत गणण्यात आल्याचे ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी लिहिलेल्या एका लेखात आम्हाला आढळले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा अभ्यास करुन त्यांनी खालील आकडेवारी दिलेली आहे.   

ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांचा महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांविषयीचा लेख/आक्राईव्ह लिंक

राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या संकेतस्थळावर 2014 मध्ये 5,650 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे दिसून येते. पी. साईनाथ यांच्या लेखानुसार एनसीआरबी स्वत:च या आकडेवारीत गडबड करत आहे. बीबीसी हिंदीवरही याबाबतचा लेख आहे. स्वयंरोजगार (शेती) स्वयंरोजगार (अन्य) या दोन कॅटिगरीच्या सहाय्याने ही गडबड करण्यात येत आहे. इंडिया टुडे आज तकने शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल एक वृत्त दिले असून या वृत्तानुसार यूपीए सरकारच्या काळात देशभरात दीड लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

आक्राईव्ह लिंक  

दैनिक हरिभूमिने 2004 ते 2014 या काळात शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्याविषयी एक वृत्त दिले आहे. या वृत्तात राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्यूरो ने दिलेल्या आकडेवारीचा आधार घेत देशभरात 171105 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.

आक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात 1,74,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे मात्र ठामपणे म्हणता येत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False


 • 6
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  6
  Shares