कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बहुजन वंचित आघाडीमध्ये प्रवेश केला का?

False राजकीय

सोशल मीडियावर कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बहुजन वंचित आघाडीमध्ये प्रवेश केला अशी पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये मराठी दैनिक लोकमत वृत्तपत्राचा लोगो वापरण्यात आलेला असून, 05 मे 2019 असे लिहिलेले आहे.

फेसबुकअर्काईव्ह

सत्य पडताळणी

पोस्टमध्ये कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी बहुजन वंचित आघाडीमध्ये प्रवेश केला आहे असे लिहिलेले आहे. याशिवाय पोस्टमध्ये लोकमत या मराठी वृत्तपत्राचा लोगो देण्यात आलेला असून, त्याखाली 05 मे 2019 अशी तारीख टाकण्यात आलेली आहे.

पोस्टसंदर्भात सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही गुगलवर सर्वात प्रथम अशोक चव्हाण यांच्या बातमीसाठी सर्च केले. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेस पक्षाकडूनच लोकसभा 2019 साठी निवडणूक लढविलेली आहे. याविषयीची बातमी दैनिक देशदूत, दैनिक सकाळ या वृत्तपत्रांमध्येही आलेली आहे.

न्यूज 18 लोकमतअर्काईव्ह

त्यानंतर महाराष्ट्रात लोकसभा 2019 साठी दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल 2019 रोजी जेव्हा मतदान झाले, त्यावेळीही कॉंग्रेस नेते म्हणूनच अशोक चव्हाण यांनी निवडणूक लढविलेली आहे.

THE ASIAN AGE l अर्काईव्ह

BBC न्यूज मराठीअर्काईव्ह

कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकसभा 2019 दुसऱ्या टप्यातील मतदानाच्या दिवशी स्वतः मतदान केल्याचा व्हिडिओ युट्युबवर एबीपी माझा या चॅनलने 18 एप्रिल 2019 रोजी अपलोड केला आहे.

अशोक चव्हाण यांनी बहुजन वंचित आघाडीमध्ये प्रवेश केला असा दावा पोस्टमध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे फॅक्ट क्रिसेंडोने अशोक चव्हाण यांच्या ऑफिशिअल फेसबुक अकाउंटवर सर्च केले. त्यांच्या अकाउंटवर अबाउट या विभागात क्लिक केल्यानंतर 06 मे 2019 रोजी खालील माहिती उपलब्ध झाली.

फेसबुक अकाउंट अशोक चव्हाणअर्काईव्ह

फॅक्ट क्रिसेंडोने अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क केला. त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला याबाबीचा इन्कार केला. कॉंग्रेस पक्षासाठी आपण काम करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

अशोक चव्हाण,
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष  

लोकमत या मराठी दैनिकाच्या 05 मे 2019 रोजीच्या (लोकमत) ऑनलाईन वेबसाईटवर देखील अशा प्रकारची कोणतीही बातमी प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे व्हायरल पोस्टमध्ये केवळ लोकमत या वृत्तपत्राच्या लोगोचा वापर करण्यात आलेला आहे.

निष्कर्ष :  सोशल मीडियावरील पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बहुजन वंचित आघाडीमध्ये प्रवेश केला हे तथ्य असत्य आहे.  

Avatar

Title:कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बहुजन वंचित आघाडीमध्ये प्रवेश केला का?

Fact Check By: Amruta Kale 

Result: False