बहरीनच्या राजाचा अंगरक्षक रोबोट आहे का? वाचा सत्य

False सामाजिक

बहरीनचा राजा रोबोट अंगरक्षकासह दुबईत पोहचल्याचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा रोबोट गोळीबार करण्यापासून बॉम्ब निकामी करण्यापर्यंतची सर्व कामे अतिशय वेगवान पध्दतीने करतो, असे यासोबत असलेल्या माहितीत म्हटले आहे. हा व्हिडिओ खरोखरच बहारीनच्या राजाचा रोबोट अंगरक्षकाचा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी 

बहरीनचा राजा रोबोट अंगरक्षकासह दुबईत पोहचल्याचा हा व्हिडिओ आहे का, याचा शोध घेण्यासाठी हा व्हिडिओ नीट पाहिला. त्यावेळी या व्हिडिओत “ETIMAD” असा शब्द दिसून आला. त्यानंतर या रोबोटवर असलेला राष्ट्रध्वजही युएईचा असल्याचे दिसून आले. युटूयूबवर वेगवेगळे शब्दप्रयोग करत शोध घेतल्यावर हा व्हिडिओ फेब्रुवारी 2019 मध्ये प्रसिद्ध झाल्याचे दिसून आले.

संग्रहित

त्यानंतर खलीज टाईम्सने 18 फेब्रुवारी 2019 रोजी केलेले ट्विट दिसून आले. या ट्विटमध्ये हा व्हिडिओ दुबई डिफेन्स शोचा म्हणजेच दुबईत भरलेल्या संरक्षणविषयक प्रदर्शनातील असल्याचे म्हटले आहे. विकीपीडियावरही या रोबोटची माहिती (संग्रहित) उपलब्ध असल्याचे दिसून येते.

संग्रहित

Khaleejtimes.png

खलीज टाईम्सने दिलेले वृत्त / संग्रहित 

image3.png

व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचीही आणि बहरीनचा राजा, हमाद बिन ईसा अल खलीफा यांची खाली तुलना करण्यात आली आहे. यातूनही ही व्यक्ती बहरीनचा राजा, हमाद बिन ईसा अल खलीफा नसल्याचे स्पष्ट होते.

निष्कर्ष

बहरीनच्या राजाचा अंगरक्षक हा रोबोट असल्याचा आणि या व्हिडिओत दिसणारी व्यक्ती बहरीनचा राजा असल्याचा दावा असत्य आहे. टायटन या ब्रिटीश रोबोटिक्स कंपनीने विकसित केलेला रोबोट आहे.

Avatar

Title:बहरीनच्या राजाचा अंगरक्षक रोबोट आहे का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False